Summer Simple Hairstyle:
Summer Simple Hairstyle:  Sakal
लाइफस्टाइल

Summer Simple Hairstyle: उन्हाळ्यात दिसाल कूल, ट्राय करा 'या' क्लासी हेअरस्टाइल

पुजा बोनकिले

उन्हाळ्यात त्वचा आणि आरोग्यासंबंधित अनेक समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाचा परिणाम सर्वांवर होतो. या दिवसांमध्ये तुम्ही घरी राहा किंवा बाहेर जा, हा प्रश्न नेहमी पडतो की, उन्हापासून वाचण्यासाठी केस कसे सांभाळावे.

घाम आणि सूर्यप्रकाशामुळे केस मोकळे ठेवल्यास खराब होऊ शकतात, म्हणून अशा हेअरस्टाइल केल्या पाहिजेत ज्यामुळे या समस्या उद्भवत नाहीत. त्यामुळे केसांसाठी उन्हाळ्यात योग्य अशी हेअरस्टाइल हवी, जी केसांना स्टायलिश लूक देण्यासोबतच आपल्याला आरामदायक वाटेल.

हाय पोनीटेल

उन्हाळ्यात केस बांधण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. यामुळे तुम्हाला क्लासी लुक मिळतो. तुम्ही ते फ्रॉक, मिडी, जीन्स किंवा कोणत्याही फॉर्मल वेअरसह सहज कॅरी करू शकता. यामुळे तुमचे केस बराच काळ सेट राहतील.

सिंपल पोनी

जर तुम्हाला उन्हाळ्यात ब्रंच किंवा आउटिंगला जायचे असेल तर सिंपल पोनी हा उत्तम पर्याय आहे. यामध्ये तुमचा लूक एकदम कॅज्युअल पण क्लासी दिसेल. याच्या मदतीने तुम्ही तुमचे पुढचे केस मोकळे सोडू शकता, जेणेकरून ते तुमचा चेहरा फ्रेम करतात. यामुळे तुमचा लुक चांगला दिसेल.

बबल ब्रेड

ही हेअरस्टाइल करणे खुप सोपी आहे. यासाठी एक साधी वेणी थोडी सैल आणि बबलच्या आकारात बनविली जाते. या हेअरस्टाईलमध्ये तुमचे केस बांधलेले राहतील आणि खूप स्टायलिशही दिसतील.

लो बन

लो बन हेअरस्टाईल हा एव्हरग्रीन लुक आहे. तेलकट केसांसाठी हे सुरक्षित हेअरस्टाईल लूक मानले जाते. परंतु तुम्ही ते कधीही तयार करू शकता. ऑफिसपासून पार्टीपर्यंत प्रत्येक लुकसोबत लो बन चांगला दिसतो.

मेसी बन

उन्हाळ्यात मेसी बन करणे हा एक उत्तम हेअरस्टाइलचा पर्याय आहे. कोरड्या आणि जाड केसांसाठी फायदेशीर आहे. बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्री ही हेअरस्टाईल कॅरी करतात. त्यानंतर ती खूप लोकप्रिय झाली आहे. तुम्ही तुमच्या कॅज्युअल वेअर्ससह हा बन बनवू शकता.

सिंपल आंबाडा

उन्हाळ्यात केसांना जितके जास्त बांधून ठेवाल तितके चांगले. जर तुम्हाला पार्टी किंवा फंक्शनला जायचे असेल तर साडी घालून साधा आंबाडा बनवू शकता. हेअरस्टाइलचा हा सर्वात सोपा आणि स्मार्ट मार्ग आहे. कोणत्याही फंक्शनसाठी तुम्ही केसांमध्ये गजराही लावू शकता.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT