Yoga Tips Sakal
लाइफस्टाइल

Yoga Tips: 'या' योगासनांचा सराव केल्यास वडिल राहतील निरोगी अन् तंदुरूस्त

Yoga Tips For Dada To Stay Fit: तुमचे वडिल राहतील निरोगी आणि तंदुरूस्त फक्त करा या सोप्या आसनांचा सराव.

Puja Bonkile

Yoga Tips For Dada To Stay Fit: आज जगभरात फादर्स डे साजर करण्यात येत आहे. हा दिवस जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी येतो. ज्याप्रमाणे आई-पडील मुलांची काळजी घेतात त्याचप्रमाणे आपण देखील वडिलांची काळजी घेतली पाहिजे. कारण एका ठाराविक वर्षानंतर त्यांना आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होतात. या 'फादर्स डे'च्या निमित्ताने तुम्ही तुमच्या वडिलांना एक उत्तम गिफ्ट देण्याचा विचार करत असाल तर त्यांना पुढील सोपे योगासन शुवकू शकता.

वृक्षासन

शरीराचे संतुलन सुधारण्यासाठी वृक्षासन हा एक उत्कृष्ट योगासन आहे. त्यामुळे वाढत्या वयाच्या व्यक्तींनी दररोज याचा सराव करावा. यासाठी पायांमध्ये २ इंच अंतर ठेवून सरळ उभे राहा. आता तुमचा एक पाय उचला आणि दुसऱ्या पायाच्या मांडीवर ठेवा. नंतर आपले हात आपल्या डोक्यावर वर करा आणि प्रार्थनेच्या स्थितीत या.

ताडासन

ताडासन केल्याने अनेक आजार दूर राहतात. आपले पाय 2 इंच अंतर ठेवून सरळ उभे रहा. यानंतर, एकमेकांना अडकवून आपले हात शरीराच्या दिशेने वरच्या दिशेने हलवा. आता शरीर स्ट्रेच करताना पायाच्या बोटांवर उभे राहा. सुमारे 20 सेकंद या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करा. ताडासन आपल्या शरीराची मुद्रा योग्य ठेवण्याचे काम करते. याशिवाय हे आपले स्नायू देखील मजबूत करते.

उष्ट्रासन

उष्टासनामध्ये आपले संपूर्ण शरीर गुंतलेले असते, त्यामुळे आपली रक्ताभिसरण प्रणालीही निरोगी राहते. शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी हा अतिशय प्रभावी व्यायाम आहे. या योगासनाचा सराव करण्यासाठी आपले हात मागे वाकवा आणि जमिनीवर विसावा. तुम्ही काही सेकंद या स्थितीत रहा. यामुळे तुमच्या वडिलांचे आरोग्य दीर्घकाळ निरोगी राहील.

वज्रासन

वाढत्या वयासोबत पचनाच्या समस्या उद्भवतात. या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही दररोज वज्रासनाचा सराव देखील करू शकता. तुमची पचनक्रिया सुधारण्यासोबतच या योगासनामुळे तुमचे पायही मजबूत होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fox Attack in Kolhapur : भरवस्तीत कोल्ह्याचा धुमाकूळ; नागरिकांवर हल्ला, थरारनाट्यानंतर पकडलेल्या कोल्ह्याचा मृत्यू

New Year Party Menu 2026: 31 डिसेंबर अन् 1 जानेवारीसाठी 'असा' बनवा परफेक्ट मेनू, चवीने जिंकाल सगळ्यांची मनं

Ghati Hospital : डॉक्टरांच्या प्रयत्नांनी मृत्यूला हरवले! विषबाधेच्या रुग्णाचे तीन महिन्यांनंतर निघाले व्हेंटिलेटर

Digital Census India : देशातील पहिली 'डिजिटल' जनगणना! राज्य सरकारकडून अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Navi Mumbai Airport: दोन दिवसांत 10 हजार प्रवाशांचा प्रवास, नवी मुंबई विमानतळाला नागरिकांची पसंती

SCROLL FOR NEXT