Parenting Tips esakal
लाइफस्टाइल

Parenting Tips : मुलांना वेळ देऊ शकत नसल्याचा गिल्ट येतोय? तज्ज्ञ सांगतात उपाय

कामाचे फक्त ८ तास नाही तर जास्त वेळ घराबाहेर जात असल्याने मुलांना हवा तसा वेळ देता येत नाही. असा गिल्ट हल्ली अनेक पालकांना असतो.

सकाळ डिजिटल टीम

Feeling Guilty For Not Being Able To Give Time To Children : सध्याची जीवनशैली प्रचंड व्यस्त आणि धकाधकीची झाली आहे. अशात वाढत्या महागाई आणि स्पर्धेमुळे घरातल्या दोन्ही पालकांना काम करून पैसे कमवणे ही काळाची गरज झाली आहे. कामाचे फक्त ८ तास नाही तर जास्त वेळ घराबाहेर जात असल्याने मुलांना हवा तसा वेळ देता येत नाही. असा गिल्ट हल्ली अनेक पालकांना असतो.

यावर Parenting Coach शिल्पा इनामदार-यज्ञोपवीत यांनी आपल्या सेल्फलेस पॅरेंटींग या पॉडकास्टमध्ये उत्तर दिलेलं आहे. त्यांनी महाराष्ट्रातले गुगल इनोव्हेटिव टीचर, नॅशनल ई-इनोव्हेशन अ‍ॅवॉर्ड, ग्लोबल आउटरिच अ‍ॅवॉर्ड विजेते प्राथमिक शिक्षक बालाजी जाधव यांच्याशी साधलेल्या संवादात या प्रश्नावर चर्चा करण्यात आली आहे. बालाजी जाधव हे दुर्गम भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे प्राथमिक शिक्षक असून त्यांनी त्यांच्या व्हर्च्युअल क्लासरुमला ४० देशांसह जोडले आहे.

जाधव यांना आपल्या कामानिमित्त बराच प्रवास करावा लागतो. शिवाय कामाच्या ८ तासाशिवाय जास्त वेळ द्यावा लागतो. मग त्यांच्या या सामाजिक पालकत्वात त्यांनी आपल्या घरातल्या पाल्यांसोबतचं पाकत्व कसं जपलं याविषयी त्यांनी सांगतलं आहे.

जाधव म्हणतात, मुलांना वेळ देणं आवश्यकच असतं. आई-वडिलांपैकी कोणी तरी एकाने तरी मुलांसोबत कायम फिजीकली उपस्थित असणं, अ‍ॅव्हेलेबल असणं आवश्यक आहेच. पण जर काही कारणाने तुम्ही मुलांना पुर्ण वेळ देऊ शकत नसाल तर तुम्ही चांगले, जबाबदार पालक नाही असा समज करण्याची गरज नाही. पालकत्व ही फार विस्तारीत संकल्पना आहे. यात मुलांचे संगोपन, विकास यागोष्टींकडे लक्ष दिले जात असते.

मग जेव्हाही तुम्ही मुलांसोबत असाल तेव्हा तुम्ही त्यांच्याशी कसे कनेक्ट होतात हे महत्वाचे असते. यासाठी काही गोष्टींकडे नीट लक्ष द्यायला हवं.

  1. मुलांशी संवाद साधावा

  2. त्यांच्या आवडी निवडी जाणून घ्याव्या

  3. त्या जपण्यासाठी शक्यती मदत करावी.

  4. मुलांची अभिरुची कशी विकसित होईल हे समजून तसे खाद्य पुरवावे

  5. यासाठी आवश्यक पुस्तक वाचनाची आवड लावावी

  6. खेळ, गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याशी आवडीचे विषय बोलावे

  7. जो काही थोडा फार वेळ मिळत आहे तो क्वालिटी टाईम कसा करता येईल हे बघावं.

  8. फक्त शालेय अभ्यास नाही तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कशी मदत करता येईल याचा विचार करून वेळ सोबत घालवावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: जय शाह - शाहिद आफ्रिदीने खरंच एकत्र बसून पाहिला IND vs PAK सामना? जाणून घ्या Viral Video मागील सत्य

रितेश देशमुखची शाळा पाहिलीत का? ना मुंबई, ना लातूर; 'या' ठिकाणी शिकलाय अभिनेता, मैदान पाहाल तर पाहतच राहाल

Latest Marathi News Updates : पंजाबच्या पुरग्रस्तांना वणीकरांचा मदतीचा हात

Sillod Rain : तीन तासाच्या पावसाने सर्वत्र दाणादाण; आमठाणा मंडळात 70 मिलिमीटर पाऊस, नऊ गावांचा काही तासासाठी तुटला संपर्क

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

SCROLL FOR NEXT