लाइफस्टाइल

महिलांनो पाच आरोगाच्या समस्येकडे करु नका दुर्लक्ष

शरयू काकडे

महिलांच्या आयुष्यात खूप हॉर्मोनल बदल होत असतात. काही बदल तसे नॉर्मल असतात पण काही बदल असे असतात की ज्यावर चर्चा करणे डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेताना स्त्रीरोगतज्ज्ञांशी या पाच महत्त्वाच्या बदलांविषयी आर्वजून सल्ला घ्यायला हवा.

मासिकपाळीमध्ये होणारा त्रास (Painful periods)

मासिकपाळीमध्ये होणाऱ्या त्रासाला डिसमेनोरिया असेही म्हणतात. मासिकपाळीदरम्यान होणाऱ्या त्रासामुळे काम करणे शक्य होत नसेल किंवा त्याच्या दैनदिन जीवनावर परिणाम होत असेल तर त्यामागील कारणाचा शोध घेणे गरजेचे आहे. निश्चित उपचार करण्यापूर्वी क्लिनिकल तपासणी आणि पेल्विक सोनोग्राफी करणे आवश्यक असते.

योनीत जाणवणारी अस्वस्थता किंवा वेदना (Vaginal discomfort or pain)

योनीत जाणवणारी अस्वस्थता किंवा वेदनेमागे वेगवेगळी कारणे असू शकतात. योनीमध्ये झालेल्या लघवीच्या किंवा संक्रमणामुळे योनीच्या सुरवातीच्या जागेवरील त्वचा उकलल्यामुळे हा त्रास जाणवू शकतो. कधी कधी योनीतून स्त्राव येऊ शकतो किंवा खाज जाणवू शकते. अशा त्रासावेळी काऊंटर मेडीसीन (प्रसिक्रिपशन शिवाय घेता येणारी औषधे) काम करत नाही, त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे. तुम्हाला जर असा काही त्रास जाणवत असेल तर स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

संभोगानंतर किंवा दोन मासिकपाळीच्या दरम्यानच्या काळात होणारा रक्तस्त्राव

तुम्हाला जर संभोगानंतर किंवा दोन मासिकपाळीच्या दरम्यानच्या काळात होणारा रक्तस्त्राव होत असेल तर हे लैंगिक संक्रमित संसर्ग (एसटीआय) असल्याचे चिन्ह असू शकते. ज्याला पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज किंवा गर्भाशयाचा कर्करोग किंवा संसर्ग असेही म्हणतात. याचे निदान करण्यासाठी पॅप स्मीयर टेस्ट, क्लॅमिडीया टेस्ट सारख्या विशिष्ट चाचण्याद्वारे खालच्या जननेंद्रियाच्या अवयवांचे स्पष्ट व्हिज्युअलायझेशन करणे आवश्यक आहे. लैंगिक संक्रमित संसर्ग(एसटीआय) आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (गर्भाची मान) लवकर शोधल्यास पूर्णपणे उपचार करता येतात.

मूत्र गळती (Urine leakage)

मूत्र गळती (Urine leakage) हा त्रास सामजिकदृष्ट्या लज्जास्पद मानला जात असल्यामुळे महिला या त्रासाबाबत व्यक्त होणे थोडे अवघड जाते. खोकताना, शिंकताना किंवा व्यायाम करताना हा त्रास होतो. कित्येकदा गॅसच्या समस्यामुळे देखील हा त्रास उद्धभवतो. अशा समस्या वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे, त्यामुळे लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क साधावा.

स्तनावर दिसणारी सुज किंवा गाठ (Lump or swelling in the breast)

स्तनाग्रांच्या (nipple) भोवती कोणत्याही प्रकारची गाठ किंवा सूज असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टराकडून क्लिनिकल तपासणी करुन घ्या जेणेकरुन पुढील सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफी टेस्ट चाचणी करुन घेता येतात. प्रत्येक महिलेने प्रत्येक महिन्याला स्वत:च स्तनांची तपासणी करणे देखील महत्त्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: पीयुष चावलाने हैदराबादला दिला मोठा दणका! धोकादायक ट्रेविस हेडला धाडलं माघारी

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

Latest Marathi News Update: पश्चिम बंगालच्या राज्यपालांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT