five tips for healthy skin even in growing age nagpur news 
लाइफस्टाइल

वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्याय? मग 'या' पाच टिप्स वापरा अन् दिसा तरुण

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : वाढत्या वयानुसार त्वचेची नैसर्गिक सुंदरता कमी होत जाते. तसेच त्वचा अधिक नाजुक बनते. नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या तेलाचे प्रमाण देखील कमी होते. त्यामुळे त्वचा कोरडी पडते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्यास सुरुवात होते. त्वचेच्या आतील फॅट कमी होते. त्यामुळे त्वचा सैल पडण्यास सुरुवात होते. तसेच चेहऱ्यावर बारीक रेषा देखील दिसतात. त्यामुळे त्वचेची योग्य काळजी घएणे गरजेचे आहे. आम्ही सांगितलेल्या टिप्स तुम्ही नियमित फॉलो केल्यास तुमची त्वचा अधिक सुंदर दिसेल आणि वयाचा अंदाज देखील लागणार नाही.

क्लिंजिंग -
सकाळी उठताच डिप-पोअर, सोप फ्री आणि नॉन फोमिंग क्लिंजरने चेहरा स्वच्छ करा. कारण फोमिंग फेस वॉश त्वचा कोरडी करते. क्लिंजर नसेल तर फेस वॉशचा वापर करा. मात्र, कमी प्रमाणात. त्यानंतर चेहरा थंड्या पाण्यानी धुवून घ्या.

टोनिंग -
क्लिजिंग करताना रोमछिद्र ओपन होतात. त्यांना बंद करण्याचे काम टोनर करतो. टोनिंगमुळे चेहऱ्यावर मॉश्चराईज होतो. त्यामुळे प्रत्येक क्लिंजिंगमध्ये टोनिंग करायला विसरू नका. तुम्ही स्वतःदेखील टोनर तयार करू शकता. तुलशी, लिंबाची पान आणि पुदीनाचे पानं घेऊन एक लीटर पाण्यामध्ये उकळा. त्यानंतर पाणी जळून अर्धे होत नाही तोपर्यंत उकळत राहा. त्यानंतर त्य्याला साठवून गरजेनुसार वापरा.

मॉश्चराइजिंग -
क्लिंजिंग आणि टोनिंग केल्यानंतर मॉश्चराइंजिग करणे गरजेचे आहे. सर्व प्रकारची त्वचा असणारे लोक मॉश्चराईजिंग करू शकतात. त्यामुळे त्वचा कोमल आणि मुलायम बनण्यास मदत होते. तसेच तुमची त्वचा जर तेलकट असेल तर त्यासाठी जेल फॉर्म्युला वापरा. याचप्राणामे साधारण त्वचेसाठी वॉटर बेस्ड, आणि कोरड्या त्वचेसाठी क्रीमी मॉश्चराइज वापरा. त्यामुळे त्वचा अधिक सुंदर दिसेल.

चेहऱ्यावर बदामाचे तेल लावा -
वयोमानानुसार त्वचेचे पोषण करणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे आडवड्यातून एकदा तरी चेहऱ्यावर बदाम तेलाने मसाज करा. त्यामुळे तुमची त्वचा अधिक सुंदर आणि तजेलदार दिसेल.

त्वचेचे रक्षण करा -
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सूर्य किरणांच्या थेट संपर्कात येणे टाळा. त्यामुळे त्वचा काळी पडते. तसेच तुमचे वयाचा अंदाज देखील येऊ शकतो. त्यामुळे कमीत कमी ३० एसपीएफवाला सनस्क्रीन वापरा. त्यामुळे यूवीए आणि यूवीबी या किरणांमुळे तुमच्या त्वचेचे संरक्षण होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT