Flipkart Introduces Open Box Delivery sakal
लाइफस्टाइल

Flipkart's Open Box Delivery : ओपन बॉक्स डिलिव्हरी: ग्राहकांचा विश्वास वृद्धींगत करण्यासाठी फ्लिपकार्टची नवीन सुविधा

ग्राहकांचा विश्वास आणखी वाढवण्यासाठी आणि खरेदीचा आनंददायी अनुभव देण्यासाठी Flipkart ने ओपन बॉक्स डिलिव्हरी सुरू केली

सकाळ वृत्तसेवा

ग्राहकांचा विश्वास आणखी वाढवण्यासाठी आणि खरेदीचा आनंददायी अनुभव देण्यासाठी  Flipkart ने ओपन बॉक्स डिलिव्हरी सुरू केली

Flipkart's Open Box Delivery : ई-कॉमर्स आता आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग  झाला आहे. मात्र उत्पादनाचा खरेपणा आणि वितरणाची विश्वासार्हता यामुळे पहिल्यांदाच अशाप्रकारे खरेदी करणारा ग्राहक काहीसा साशंक असतो.

त्यावरच मात करण्यासाठी Flipkart ने ओपन बॉक्स डिलिव्हरी आणली आहे. हा एक ग्राहककेंद्री उपक्रम आहे. ग्राहकहिताचे रक्षण आणि संपूर्ण खरेदी प्रक्रियेतील विश्वास वृद्धींगत करण्याचे त्याचे ध्येय आहे.

ऑनलाइन खरेदीच्या बाबतीत, विशेषत: स्मार्टफोन आणि मोठ्या इलेक्ट्रॉनिक्स सारख्या महाग उत्पादनांच्या बाबतीत ग्राहकांना वाटणारी काळजी, भीती Flipkart नक्कीच समजून घेते. 

वितरीत न झालेला किंवा खराब झालेला माल, हरवलेली शिपमेंट आणि चुकीची डिलिव्हरी अशा साध्या पण महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कंपनीने मोठ्या पातळीवर एक ग्राहक संशोधन  मोहीम हाती घेतली आहे. 

आपल्या खात्याचे  संरक्षण, पैसे देण्यासाठी सुरक्षित  पर्याय, सुरक्षित पॅकेजिंग, वेळेवर वितरण आणि  सहज परतावा या गोष्टी एकत्रित राबवत Flipkart ने ग्राहकांची निष्ठा जिंकून घेतली आहे आणि पहिल्यांदाच खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्येही एक विश्वास निर्माण केला आहे.

 ओपन बॉक्स डिलिव्हरी सादर करत आहे;

ग्राहकांचा विश्वास आणखी वाढवण्यासाठी आणि खरेदीचा आनंददायी अनुभव देण्यासाठी  Flipkart ने ओपन बॉक्स डिलिव्हरी सुरू केली आहे.

ही नाविन्यपूर्ण सेवा ग्राहकांना डिलिव्हरी स्वीकारण्यापूर्वी त्यांच्या शिपमेंटची पडताळणी आणि तपासणी करण्यास परवानगी देते. त्यांना उत्पादनाच्या अस्सलतेचे आणि स्थितीचे मूल्यांकन करून माहितीपूर्ण निर्णय घेण्यास मदत करते.

 ओपन बॉक्स डिलिव्हरी कसे कार्य करते;

पात्र वस्तूंसाठी ऑर्डर देताना, ग्राहकांना त्यांच्या विशिष्ट पिन कोडसाठी ओपन बॉक्स डिलिव्हरी उपलब्ध असल्यास चेकआउट प्रक्रियेदरम्यान एक सूचना प्राप्त होईल. ऑर्डर डिलिव्हरीसाठी तयार झाल्यावर, ग्राहकांना तपशील,

डिलिव्हरीची स्थिती आणि सूचना असलेला एसएमएस प्राप्त होतो. ग्राहकाच्या दारापर्यंत पोहोचण्यापूर्वी, फ्लिपकार्ट विशमास्टर wishmaster  (डिलिव्हरी पार्टनर) ग्राहकाशी संपर्क साधतो आणि ओपन बॉक्स डिलिव्हरी करण्यासाठी त्यांची संमती घेतो.

ग्राहकाच्या उपस्थितीत, विशमास्टर उत्पादनाचे  पॅकेजिंग उघडतो, यादरम्यान तो ओपन बॉक्स डिलिव्हरीचे फायदे स्पष्ट करतो. त्यानंतर ग्राहकाला  वितरित केलेल्या ऑर्डरची तपासणी करण्याची परवानगी दिली जाते.

ग्राहकाने बॉक्समधील सामग्रीची पडताळणी केल्यानंतर आणि त्याला हवे ते आणि त्यांनी मागवलेलेच  उत्पादने चांगल्या स्थितीत मिळाल्याची खात्री केल्यानंतर, ते वन टाइम पासवर्ड (OTP) शेअर करून डिलिव्हरी स्वीकारण्यास पुढे जातात.

ऑर्डर प्रीपेड नसल्यास, कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) किंवा क्यूआर कोड पेमेंटद्वारे पेमेंट पूर्ण केले जाऊ शकते. एकदा यशस्वी वितरणाची खात्री झाल्यानंतर,

विशमास्टर उत्पादन परत बॉक्समध्ये पॅक करेल, जर ग्राहकांनी रिटर्न करण्याचा निर्णय घेतला तर शिपमेंट आणि बॉक्स दहा दिवसांसाठी राखून ठेवले जाईल.

 ओपन बॉक्स डिलिव्हरी अतिरिक्त खर्च नाही

ओपन बॉक्स डिलिव्हरी ही एक मूल्यवर्धित सेवा आहे जी Flipkart  ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय प्रदान करत आहे. ग्राहकांना त्यांच्या खरेदीची कसून तपासणी करण्याचे आणि  निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य ही सेवा  देते. बॉक्स उघडल्यानंतर ग्राहक असमाधानी असल्यास, त्यांना त्यांच्या दारात उत्पादन नाकारण्याचा पर्याय आहे. यानंतर लगेचच  Flipkart परतावा सुरू करते.

फसवणुकीपासून ग्राहकांना वाचवण्यासाठी आणि  सुरक्षित आणि आनंददायी खरेदी अनुभव देण्यासाठी फ्लिपकार्टने राबवलेल्या अनेक उपायांपैकी ओपन बॉक्स डिलिव्हरी हा एक चांगला पर्याय आहे. 

 त्यांच्या गोदामांमध्ये आणि संपूर्ण पुरवठा साखळीमध्ये अनेक तपासण्यांचा समावेश करून, Flipkart ग्राहकांची सुरक्षितता आणि समाधान सुनिश्चित करण्यासाठी आपली वचनबद्ध आहे.

ऑनलाइन शॉपिंग क्षेत्रात अनेक नवे बदल घडत आहेत त्याचप्रमाणे ते अधिक चांगल्या पद्धतीने विकसीत होत आहे.  लोकप्रियता मिळवत आहे, Flipkart ग्राहकांचा विश्वास आणि समाधान वाढवण्यासाठी समर्पित आहे.

ओपन बॉक्स डिलिव्हरी हा  Flipkart  च्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाचा दाखला आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खरेदीवर नियंत्रण ठेवता येते, उत्पादनाची सत्यता सुनिश्चित होते आणि ईकॉमर्सवरील विश्वास वाढतो.

खरेदी प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर ग्राहकांच्या हिताचे रक्षण करून, Flipkart भारतीयांसाठी त्यांच्या खरेदीच्या गरजा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी एक विश्वासार्ह  व्यासपीठ बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan statement: 'ऑपरेशन सिंदूर'च्या पहिल्याच दिवशी झाला होता भारताचा पराभव - पृथ्वीराज चव्हाणांचं विधान!

IPL 2026 All Teams: ग्रीन सर्वात महागडा खेळाडू, तर अनकॅप्ड खेळाडूंही मलामाल; लिलावानंतर पाहा सर्व संघांतील खेळाडूंची यादी

IPL 2026 Auction Live: जाता जाता Prithvi Shawला दिलासा! एका फ्रँचायझीला आली दया... घेतलं एकदाचं संघात, बघा कोणाकडून खेळणार

PL 2026 Auction : पप्पू यादव यांचा मुलगा आयपीएलमध्ये खेळणार; लिलावात मोजली तगडी रक्कम, जाणून घ्या कोणत्या संघाची झाली कृपा

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

SCROLL FOR NEXT