Kitchen hacks esakal
लाइफस्टाइल

Kitchen hacks : जेवणात मीठ जास्त झालंय?, मास्टर शेफने दिल्यात या खास टिप्स!

मीठ जास्त झाल्यास भाजी फेकून देऊ नका, आधी हे वाचा!

सकाळ डिजिटल टीम

कोणतीही स्त्री जेवण बनवताना त्याचे कौतूकच होईल असेच बनवत असते. पण, अनावधानाने तिच्याकडून तेल, मीठ, तिखट जास्त पडते. आणि जेवणाच्या ताटावरच तिची खिल्ली उडवली जाते. किंवा मग जेवणाला कोणीही हात लावत नाही.

ती बिचारी मात्र स्वत:कडून कोणतीतरी मोठी चूक घडल्यासारखी नाराज होऊन बसते. तिने ती गोष्ट मुद्दाम केलेली नसते तरीही तिला दोष दिला जातो. आपल्यामुळे कोणी नीट जेवलं नाही हि सल मात्र तिला लागून राहते.

तूमच्या बाबतीतही असे प्रसंग झाले असतील. त्यामुळे तूम्हाला याची कल्पना आली असेलच. जेवणात मीठ जास्त झाल्यास काय करावे हे नेमके माहिती नसल्याने अनेकींचा गोंधळ उडतो. त्यामुळेच आज मास्टर शेफ पंकजा यांनी काय टिप्स दिल्या आहेत ते पाहुयात.

आमटीत मीठ जास्त पडल्यास

कोणतीही पातळ भाजी बिघडली तर त्यामध्ये थोड पाणी वाढवून ती ठिक करण्याचा विचार अनेकजण करतात. पण, त्यामूळे भाजी अगदीच बेचव होते. त्यामुळे पातळ भाजी किंवा आमटीमध्ये पाणी वाढवू नका. त्यामध्ये कणकेचे बारीक गोळे टाका. थोडावेळ शिजवून घ्या. आणि जेवताना कणकेचे गोळे काढून टाका.   

भाजीत मीठ जास्त झाल्यास

भाजी घट्ट असल्याने तिच्यातील मीठाचा खारटपणा शोषून घेतला जात नाही. त्यामुळे अशा भाजीत कणकेचे गोळे टाकता येत नाहीत. तर, त्याऐवजी त्यामध्ये लिंबांचा रस, दही, बारीक चिरलेला टोमॅटो असे पदार्थ आपण घालू शकतो. जे भाजीचा मूळ खारटपणा घालवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT