Homework tips 
लाइफस्टाइल

Homework Tips: पालकांनो, मुलांचा अभ्यास सोपा करायचाय! चार गोष्टी पडतील उपयोगी

अभ्यास करण्यापेक्षा खेळायला कधी जातो, याचीच मुलं वाट बघत असतात

सकाळ डिजिटल टीम

मुलांच्या अभ्यासासाठी त्यांच्या सतत पाठी लागावे लागते. सतत पाठी लागलं की कुठे अभ्यास पूर्ण करतात अशा तक्रारी पालक एकमेकांजवळ करत असतात. मुलांचे मन चंचल असते. त्यांचे लक्ष खेळाकडे जास्त असते. अभ्यास करण्यापेक्षा खेळायला कधी जातो, याचीच मुलं वाट बघत असतात. अशावेळी अभ्यास पूर्ण होणार कसा?याची चिंता पालकांना सतावते. घरी अभ्यास करत नाही म्हणून शिकवणी लावली जाते. तिथेही, शाळेतही गृहपाठ पूर्ण करावाच लागतो. काहींना अभ्यास पटापट करणं जमतं. तर काही कंटाळा करतात. त्यामुळे पालकांना अधिक सजग व्हावे लागते. मुलांनी स्वत:हून अभ्यास करावा यासाठी काही टिप्स वापरल्यास त्यांना अभ्यास करण्याचा कंटाळा येणार नाही.

study

या चार टिप्स तुमच्यासाठी

अभ्यासाची योग्य वेळ ठरवा- काही मुलं अभ्यासाची पुस्तक घेऊन वाचायला बसली की त्यांचे लक्ष इथे तिथे जास्त असते. त्यामुळे त्यांचा गृहपाठ पूर्ण व्हायला खूप जास्त वेळ लागतो. ते पालकांसह मुलांनाही कंटाळवाणे होते. म्हणूनच गृहपाठ पूर्ण करण्यासाठी त्याची योग्य वेळ ठरवा. म्हणजेच जर त्याने गृहपाठ एका तासात पूर्ण केला तर त्यांना खेळायला पाठवणार असे सांगा. त्यामुळे मुलं वेळेत गृहपाठ पूर्ण करतील, तसेच त्यांना त्याची सवयही लागेल.

Study

खेळता खेळता शिकवा अभ्यास- मुलांना अभ्यासापेक्षा खेळणे अधिक आवडते. त्यामुळे अभ्यासाचा अशी मुलं कंटाळा करतात. म्हणून मुलांचा अभ्यास सोपा करायचा असेल तर त्यांना खेळता खेळता अभ्यास शिकवा. उदाहरणार्थ मूल लहान असेल आणि त्याला शाळेने दिलेल्या अभ्यासात रंगाची नावे लक्षात ठेवण्यास सांगितले असेल, तर तुम्ही त्याच्यासोबत रंगांचा खेळ खेळू शकता. त्यामुळे त्याला रंगांची नावे आठवतील आणि खेळण्यातही त्याचे लक्ष लागले. अशाचप्रकारे तुम्ही त्याला गणितातली बेरीज-वजाबाकी शिकवू शकता.

Study Tips

व्हिडिओज आणि लर्निग अॅपची मदत घ्या- अभ्यासाविषयक योग्य संकल्पना न समजल्याने मुलं गृहपाठ मध्येच सोडून देतात. असे होत असल्यास तुम्ही व्हिडिओ किंवा लर्निंग अॅपची मदत घेऊ शकता. अनेक मुलांना वाचनाचा कंटाळा येतो. त्यापेक्षा ते बघून शिकणे जास्त पसंत करतात. त्यामुळे तुम्ही मुलांना व्हिडिओ आणि लर्निंग अॅप्सच्या मदतीने शिकवू शकता. अॅप वापरताना मुलांना त्यांच्या उणिवा आणि चुका कळू शकतात. अशावेळी ते भविष्यात चुका टाळतात. तसेच गृहपाठही वेळेवर पूर्ण करतात.

Study

एकत्र काम करा- मुलांचा गृहपाठ सोपा करण्यासाठीचा योग्य आणि उत्तम मार्ग म्हणजे तुमचे मुल गृहपाठ करत असताना तुम्हीही त्याच्याबरोबर तुमचे ऑफिसचे काम घेऊन बसा. काम पूर्ण करण्याबाबत तुम्ही त्यांच्याशी स्पर्धाही करू शकता. जो पहिल्यांदा काम पूर्ण करेल त्याला संध्याकाळी आईस्क्रीम पार्टी मिळेल, असंही तुम्ही त्यांना सांगू शकता. मुलांना अशा गोष्टींमध्ये मजा येते. त्यामुळे ते त्यांचे काम मनापासून करतील. पण हे दरवेळी करावं असं नाही. तुम्ही आईस्क्रीमच्या जागी इतर पदार्थही त्यांना देऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT