French Toast Recipe esakal
लाइफस्टाइल

French Toast Recipe : छोटे अन् मोठे दोघांच्याही मधल्या भुकेसाठी परफेक्ट आहे फ्रेंच टोस्ट, दोन मिनिटात तयार होतात

तूम्ही गोड अन् तिखट अशा दोन्ही पद्धतीने हे टोस्ट करू शकता

सकाळ डिजिटल टीम

French Toast Recipe :

आता लवकरच उन्हाळी सुट्ट्या सुरू होतील. तेव्हा मुलांना खेळून सतत भूक लागते. मुलांसह कधी थकून ऑफिसवरून घरी आलेल्या पतीदेवांनाही कडकडून भूक लागलेली असते. अशावेळी काहीतरी हलकं पण चवीच खायचं असतं. तेव्हा फ्रेंच टोस्ट बनवू शकता.

अंडी न खाणारे लोकही ही रेसिपी आवडीने खातात.मुलांच्या पोटातही अंडी जातात. त्यामुळे मुलांसाठी पौष्टिक आहार आहे. सकाळी किंवा सायंकाळच्या न्याहरीला देण्यासाठी हा परफेक्ट पदार्थ आहे. कारण तो बनवायला फारसा वेळही लागत नाही. तर तो कसा बनवायचा हे पाहुयात. (French Toast Recipe)

साहीत्य – दोन अंडी,

  • अर्धा कप दूध,

  • ३ टे.स्पून साखर,

  • ४ ब्रेडचे स्लाईस आणि तूप (Recipe)

कृती

  1. प्रथम अंडी फेटून घ्यावीत

  2. त्यात दूध अन् साखर विरघळेपर्यंत फेटून घ्या

  3. पॅनमध्ये २ चमचे तूप गरम करावे

  4. आता अंड्याचे मिश्रण एका पसरट बशीत घ्यावे

  5. ब्रेडचा एक एक स्लाईस दोन्ही बाजूने अंड्याच्या मिश्रणात बुडवावे

  6. आता ब्रेड तव्यात टाकून दोन्ही बाजूने चांगला खरपूस तळून घ्यावा

गोड ब्रेड नको असेल तर अंडी फेटून त्यामध्ये दूध साखरेऐवजी मीठ,मीरपूड, लाल तिखट घालावे. याने चव अगदी वेगळी अन् चटपटीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT