Friendship Day esakal
लाइफस्टाइल

Friendship Day : नव्या शहरात आलाय? अनोळखी शहरात चांगले मित्र बनवण्यासाठी जाणून घ्या हे 6 फ्रेंडशिप मंत्रा

आज आम्ही तुम्हाला नव्या शहरात चांगले मित्र कसे शोधायचे याबाबत काही टिप्स सांगणार आहोत

साक्षी राऊत

Friendship Day : मनुष्य हा समाजशिल प्राणी आहे हे आपणा सगळ्यांनाच माहितीये. मात्र दिवसभर आपण कितीही नवनवीन लोकांना भेटत असलो तरी मनातल्या गोष्टी, गोंधळ आणि दु:ख सांगण्यासाठी आपल्याला आपलं कुटुंब आणि हक्काच्या मित्रांची गरज भासते.

शिकण्यासाठी जेव्हा आपण नव्या शहरात जातो तेव्हा आपल्या नेहमीच्या मित्रमंडळींपासून आपण लांब असतो. शिवाय अनोळखी शहरात नवे चेहरे आणि सगळ्या गोष्टी नवीन असतात. यात चांगले मित्र शोधायचे कसे असा गोंधळ तुमच्याही मनात कधीतरी निर्माण झाला असावा किंवा होऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला नव्या शहरात चांगले मित्र कसे शोधायचे याबाबत काही टिप्स सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया याबाबत सविस्तर.

बर्‍याच वेळा आपल्या तोंडून बोलताना अपशब्द किंवा चुकीचे शब्द बाहेर पडतात ज्यामुळे आपली चुकीची छाप इतरांच्या नजरेत पडत असते. म्हणूनच कोणाच्याही समोर वाईट शब्द वापरू नका. प्रथम तुम्ही मैत्री करा आणि त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये जा. त्यानंतरच तुम्ही मित्रांचा स्वभाव समजून त्यांच्याशी विनोद करू शकता. इतरांची चेष्टा करणे टाळा.

स्वतःची ओळख करून देण्यास अजिबात संकोच करू नका. हपसतमुखाने लोकांना भेटा आणि त्यांना सांगा की तुम्ही येथे नवीन आहात. त्यांची माहितीही तुम्ही मिळवू शकता. तुम्ही नवीन शाळा किंवा महाविद्यालयात गेला असाल तर वर्गमित्रांची मदत घ्या आणि सभ्य व्हा. चांगली छाप पाडून तुम्ही अनेक मित्र बनवू शकता. (Lifestyle)

मैत्रीत समजुतदारपणा असल्यास ती दीर्घकाळ टिकते. मात्र मित्रांच्या चुकीच्या वर्तणुकीत किंवा त्यांच्या चुकीच्या गोष्टींत त्यांची बाजू घेऊ नका. कायम चांगल्या मित्रांशी मैत्री करा. त्यांच्याकडून शिकण्यासारख्या चांगल्या गोष्टी आत्मसात करा. वाईट मित्रांची संगत कधीही धोक्याची तेव्हा अशा मित्रांशी मैत्री कधीही धोक्याची. (Friendship Day)

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT