abdul kalam Esakal
लाइफस्टाइल

Friendship Day: मैत्रीच्या मार्गात जेव्हा धर्म आड आला तेव्हा कलाम साहेब रडले होते..

दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना या देशाचे खूप प्रेम मिळाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

मिसाईल मॅन आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम हे एक महान व्यक्तिमत्व होते. त्यांनी वर्षानुवर्षे विज्ञान क्षेत्रात नुसते कामच केले नाही तर आपले त्या क्षेत्रात विशेष योगदानही दिले आहे.

भारताने त्यांच्या देखरेखीखाली 1998 मध्ये पोखरणमध्ये दुसरी यशस्वी अणुचाचणी घेतली आहे. कलामांनी शास्त्रज्ञ या नात्याने त क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात देशाला जागतिक दर्जाचे बनवले आहे. डॉ एपीजे अब्दुल कलाम हे देशाचे 11 वे राष्ट्रपती होते. ते राष्ट्रपती असतांना त्यांनी करोडो भारतीयांना स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा दिली. दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांना या देशाचे खूप प्रेम मिळाले आहे, पण शाळेत शिकत असताना त्यांना मुस्लिम असल्यामुळे मैत्रीच्या नात्यांत भेदभावाला देखील सामोरे जावे लागले आहे. त्यांच्या माय लाईफ' या आत्मचरित्रात त्यांनी लिहिले आहे की, एकदा मी मुस्लिम असल्यामुळे माझा शाळेत बसायचा बाकडा बदलला होता. खरे तर रामेश्वरम प्राथमिक शाळेत त्यांची मैत्री ही रामनाध शास्त्री या ब्राह्मण विद्यार्थ्याशी झाली. हे दोघे मित्र असल्यामुळे वर्गात एकत्र बसायचे.

कलाम पुढे लिहितात की, एकदा शाळेत नवीन शिक्षक आले. एका ब्राह्मण मुलासोबत एक मुस्लिम मुलगा बसला आहे हे त्यांना आम्ही घातलेल्या ड्रेसवरून समजले. त्यावर ते शिक्षक चिडले आणि त्यांनी मला उठायला सांगुन दुसरीकडे बसवले.

त्या शिक्षकांने जे कृत्य माझ्यासोबत केले ते पाहून माझ्या बालमनाला धक्का बसला आणि मला प्रचंड दुःख झाले. मला आजही तो दिवस आठवतो त्या दिवशी मी प्रचंड रडलो होतो कारण मला माझ्या जिवलग मित्रांपासुन दुर बसवले गेले होते, काय तर म्हणी हिंदू आणि मुस्लिम एकत्र बसू शकत नाहीत. जेव्हा रामनाध शास्त्री यांच्या वडीलांना ही बाब कळताच त्यांनी कलाम यांच्या वडिलांशी चर्चा केली. आणि त्यानंतर तातडीने दोघेही शाळेत गेले आणि त्यांनी त्या नविन आलेल्या शिक्षकाला बजावून सांगितले की शालेय वर्गात धर्म मुळीच आणू नका. सर्वधर्म समभावाची मूल्ये ही बालपणीच विद्यार्थ्यांच्या मनात रूजवली जातात ही गोष्ट त्यांनी त्या शिक्षकाला पटवून सांगितली.ही गोष्ट पटल्यानंतर मग शिक्षकांने या दोन मित्रांना पुन्हा शेजारी बसवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT