CNG Kit Price in Maharashtra Esakal
लाइफस्टाइल

CNG Kit Price: जुन्या गाडीत CNG किट बसवायचंय? इतका येईल खर्च

CNG Kit Price in Maharashtra: येत्या काळात सीएनजीमुळे पेट्रोल किंवा डिझेलमुळे होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे. यामुळेच सीएनजी हा एक उत्तम पर्याय आहे

Kirti Wadkar

CNG Kit Price in Maharashtra: पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्याने अलिकडे अनेकजण कारमध्ये सीएनजी किट बसवण्याचा विचार करू लागले आहेत. जुन्या गाडीत CNG किट लावण्यासाठी खर्च येत असला तरी येत्या काळात सीएनजीमुळे पेट्रोल किंवा डिझेलमुळे होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे. यामुळेच सीएनजी हा एक उत्तम पर्याय आहे. Fuel Saving Tips in Marathi Can we fit CNG Kit in Old Car

CNG बसवताना ते कोणत्या कंपनीचं बसवावं? त्यासाठी किती खर्च येईल असे अनेक प्रश्न निर्माण होतात. तुमच्या या प्रश्नांची उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. जुन्या कारमध्ये सीएनजी CNG किट बसवत असताना कंपनीची निवड करण्याआधी आपल्या कारच्या मॉडेलला Car Model ते बसवणं शक्य आहे का याची खातरजमा करून घ्यावी. यासाठी जवळच्या RTO ला भेटू देऊन तुम्ही माहिती घेऊ शकता.

बाजारातील CNG कंपन्या

बाजारात अनेक CNG कंपन्या आहेत. मात्र यातील काही कंपन्यांना सरकारकडून मान्यता मिळालेली नाही. अशा कंपनीचे दर कमी असले तरी या कंपनीचं सीएनजी बसवून घेणं धोकादायक ठरू शकतं.

शिवाय अशा अनेक मान्यता नसलेल्या कंपनीचं किट बसवल्यास RTO कडून मान्यता मिळण्यास अडचणी निर्माण होतात. यासाठी काही नावजलेल्या ब्रॅण्डची निवड करावी. यात तुम्ही लांडी रेन्झो (Landi Renzo), BRC, SKN, Lovato Autogas, Tartarini, Tomasetto, Zavoli, Bedni अशा काही ब्रॅण्डची निवड करू शकता.

CNG किट लावण्याचा खर्च

ब्रॅण्डनुसार CNG किट बसवण्याचा खर्च वेगवेगळा असतो. त्याचप्रमाणे गाडीच्या मॉडेलवरही हे अवलंबून असतं. खर्चाचा साधारण विचार करता अगदी २५-२८ हजारांपासून ते ४०-५० हजार रुपयांपर्यंत यासाठी तुम्हाला खर्च येऊ शकतो. यात सीएनजी सिलेंडरची किंमतही गृहित धरण्यात आली आहे. 

हे देखिल वाचा-

CNG किट बसवल्यानंतर कारचा इंधनवरील होणारा खर्च जरी वाचत असला तरी CNG कारला अधिक मेंटेंनेंस असतो. तसचं सीएनजी कारची योग्यती काळजी घेतल्यास चांगला मायलेज मिळणंही शक्य होतं. त्यासाठी काही टिप्सचा वापर केल्यास चांगला मायलेज मिळवून अधिक बचत करणं शक्य आहे. 

CNG किट ओरिजनल असावं- अनेक ऑटोमोबाईल कंपन्या त्यांचे CNG कारचे मॉडल लॉन्च करत आहेत. कंपनीकडून बसवण्यात आलेल्या सीएनजी कीटसह गाडी खरेदी करणं कधीही अधिक विश्वसनीय असतं. मात्र जर तुम्ही तुमच्या पेट्रोल कारमध्ये CNG बसवण्याचा विचार करत असाल तर ओईएम प्रमाणित डीलरकडूनच हे किट खरेदी करावं. केवळ काही पैशांची बचत करण्यासाठी नॉन- ब्रॅण्डेड किट बसवू नये. 

कारमध्य़े कमी वजन ठेवा- जर तुम्ही CNG कार वापरत असाल तर कारमध्ये जास्त वजन ठेवू नका. कारमध्ये जितकं जास्त वजन असेल तितका अधिक दबाव इंजिनवर पडू शकते. त्यामुळे कारची इंधन क्षमता कमी होवू शकते.

स्पार्क प्लग बदलावं- CNG कारचं इग्निशन तापमान हे पेट्रोल कारपेक्षा अधिक असतं. म्हणूनच CNG कारमध्ये शक्तीशाली स्पार्क प्लग वापरणं गरजेचं आहे. याशिवाय एकसारख्याच कोडचा स्पार्क प्लगचा सेट असावा याची खात्री करून घ्यावी. तसचं कारची हीट रेंजही कंपनीच्या नियमानुसारच असावी. 

गॅस लिकेज चेक करावी- जर तुमच्या CNG गॅसच्या टाकीत लिकेज असेल तर मायलेज कमी होण्याची दाट शक्यता असते.  तसचं सुरक्षेच्या दृष्टीने देखील ते धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे सीएनजी कीटची वेळोवेळी तपासणी करा.

खास करून तुम्ही अनेक दिवस एका जागी कार पार्क ठेवली नसेल आणि ती वापरली नसेल तर केव्हाही कारच्या गॅस टाकीची पूर्ण तपासणी करावी. यासाठी कारमध्ये गॅस डिटेक्टर इंस्टॉल करणं कधीही फायदेशीर ठरू शकतं. 

एअर फिल्टर स्वच्छ ठेवणं गरजेचं- कारच्या एअर फिल्टरची काळजी घेणंही गरजेचं आहे. सीएनजी हा हवेपेक्षाही हलका असतो त्यामुळे काही वेळा हवेतील कण पॉवरट्रेनमध्ये समस्या निर्माण करू शकतात. हवा सहसपणे पार न होवू शकल्याने इंजिनवर दबाव निर्माण होण्यास सुरूवात होते.

अशा प्रकारे तुम्ही तुमच्या जुन्या कारमध्ये CNG किट बसवून त्याची योग्य त्या प्रकारे काळजी घेतल्यास तुमची बचत नक्की होईल. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक

Latest Marathi News Live Update : भारताच्या मीराबाई चानूनं रौप्य पदक पटकावलं

Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त

RSS 100 Years : सोलापुरात २२७० स्वयंसेवकांचे पथसंचलन; अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी; राष्ट्रीय पंचसूत्रीची घोषणा

Pankaja Munde: पण, आमच्या लेकरांच्या ताटातले घेऊ नका;आरक्षणावरून पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांचे मत

SCROLL FOR NEXT