Navratri 2023 esakal
लाइफस्टाइल

Navratri 2023 : गरबा नाईटसाठी  फुल ऑन एनर्जी देतील हे पदार्थ, सगळा थकवा होईल छुमंतर

काही लोक गरब्याला नाचतात कमी अन् थकतात जास्त

Pooja Karande-Kadam

Navratri 2023 : गरबा हे एक पारंपरिक नृत्य आहे.पण  हे नृत्य करण्यासाठी सर्वत्र वयोगटातली मंडळी नेहमीच तयार असतात. गुजरातमध्ये परंपरा असली तरी इतर देशांमध्ये ती एक फॅशन बनली आहे. आजकाल नवरात्रीच्या काळात देशभर गरब्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

नवरात्रीत गरब्याची प्रथा खूप जुनी आहे. जे एकेकाळी लोकनृत्य होते. जर तुम्हीही यावर्षी गरबा नाईटला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खास डाएट टिप्स आहेत (Diet Tips For Garba). ज्यामुळे तुम्हाला गरब्यामध्ये फ्रेश वाटेल अन् तुमचा डान्स पाहण्यासाठी सगळे गर्दी करतील.

गरबा अनेक तास केला जातो. त्यामुळे गरब्यात एनर्जी टिकवून ठेवावी लागते. नाहीतर १० मिनिट गरबा केला की तासभर बसणारे अनेक लोक आहेत. खरंतर गरब्याची गाणी ऐकूनच लोकांच्या शरीरात एनर्जी येते. पण, काहींना मात्र सतत एनर्जी ड्रिंकची गरज असते.

तुम्हालाही न थांबता गरबा करायचा असेल. सगळ्यांनी तुमचं कौतुक करावं असं वाटत असेल तर तुम्हाला या गोष्टी मदत करू शकतात.

लिंबू पाणी

गरब्यासाठी शरीर हायड्रेटेड असणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही गरब्याला सुरूवात करण्याआधी लिंबू पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल आणि शरीरात पाण्याची कमतरता भासणार नाही.

तसेच बराच वेळ गरबा एन्जॉय केल्यानंतर तुम्ही छोटा ब्रेक घेऊ शकता. त्यानंतर लिंबू पाणी पिऊन पुन्हा एकदा गरबा सुरू शकता. (Lemon Water)

नारळपाणी

गरब्याला जाण्यापूर्वी तुम्ही नारळपाण्याचे सेवन करू शकता. नारळाचे पाणी भरपूर प्रमाणात पोषक मानले जाते. हे शरीर हायड्रेड ठेवते आणि तुम्हाला दीर्घकाळ फ्रेश ठेवण्यास मदत करते.

फळे, ज्यूस

गरबा रात्रीसाठी तुम्ही दिवसभरात फळे खाण्यास सुरुवात करू शकता. फळे खाल्ल्याने तुमचे शरीर निरोगी राहू शकते. फळे शरीराला ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात. तसेच फळांचे ज्युसही तुम्हाला इंस्टंट रिफ्रेश करू शकतात.

ड्रायफ्रूट्स

ड्रायफ्रूट्स शरीरासाठी किती फायदेशीर असतात हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. सुक्या मेव्यामध्ये आढळणारे पोषक घटक शरीराला दीर्घकाळ ऊर्जावान ठेवण्यास मदत करतात.

त्यामुळे पर्स अथवा खिशात तुम्ही ड्रायफ्रूट्स ठेऊ शकता. ज्यामुळे तुम्ही ते कधीही खाऊ शकता. तुम्हाला गरबा करण्यास नवी उर्जा देतील अन् तुम्हाला फ्रेश ठेवतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT