Genelia D'Souza  esakal
लाइफस्टाइल

Genelia D'Souza : चिकन शिवाय कसा बनवायचा चिकन पुलाव? गोड मराठीत जेनलियाने दिली आयडीयाची कल्पना!

परफेक्ट डायट असतं तरी काय? जेनेलिया वहिणींनी सांगितला फिटनेस फंडा

सकाळ डिजिटल टीम

वेड हा मराठी चित्रपट येत्या 30 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. जिनिलिया देशमुख या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत डेब्यू करणार आहे. या चित्रपटात श्रावणी आणि सत्या यांची अनोखी प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलिया देशमुखने मधुराज रेसिपी या शोमध्ये हजेरी लावली होती. तिथे तिने रितेश आणि मुलांसाठी डब्यात काय द्यायचे, याच्याही टिप्स दिल्या आहेत.

जेनेलियाने मधुराकडून खास चिकन शिवाय चिकन पुलाव कसा करायचा हे शिकले. त्यासाठी लागणारे सॉसेज चिकनचे प्रोडक्टही जेनेलियानेच लॉन्च केले आहे. जेनेलिया, रितेश आणि त्यांची मुलेही वेगन आहेत. ते मांसाहार करत नाहीत. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, आधी आम्ही दोघेही मांसाहारावर अक्षरश: तुटून पडायचो. पण नंतर त्याचा त्रास होऊ लागल्याने शाकाहारी व्हायचे ठरवले.

असाच एकदा अमेरिकेत असताना रितेशने खिमा खाल्ला. तोही व्हेज होता. त्याला तो नॉनव्हेज पदार्थच वाटला. त्यावेळी आपण हे भारतात का नाही सुरू करू शकत अस आम्हाला वाटलं. त्यामूळे आम्ही भारतातही हा पदार्थ लॉन्च केला. सॉसेज चिकन हे शाकाहारी असून ते मासांहारा इतकेच प्रोटीन्स आणि फायबर देते. त्याची चवही मांसाहारासारखीच असल्याचे तिने सांगितले. हेच सॉसेज वापरून माझ्या सासूबाईंनी चिकन सुक्क केलं होतं. आणि घरातही ते सर्वांना आवडलं होतं, असेही ती म्हणाली.

तिला आवडणाऱ्या पदार्थाबद्दल जेनेलिया म्हणाली की, पिठलं भाकरी तीला आवडते. त्यासोबत शेंगदाणा चटणीही रोजच्या जेवणात असते. हेच परफेक्ट डायट असल्याचेही तिने सांगितले. रीतेशही जेवणात मदत करतो का? यावर ती म्हणाली की, रितेश केक ‘लय भारी’ बनवतो.

मुलांच्या खाण्याच्या सवयीही साध्याच असून ते फास्टफूडपासून दुर राहतात. तेही घरी जे जेवण असेल तेच खातात. आठवड्यातून एखाद्या दिवशी ते पास्ता किंवा फास्टफूड खातात. तसेच, त्यांना चिप्सही घऱीच बनलेले आवडतात. त्यासाठी मी घरीच नाचणी आणि बटाट्याचे चिप्स, पापड देते, असेही जेनेलियाने सांगितले.

जेनेलियाच्या सॉसेज चिकन पुलावची रेसिपी

पॅनमध्ये एक चमचा तेल घालून त्यात तेलाची फोडणी करावी. त्यात जिरे घालावे. जिरे परतले की त्यामध्ये कांदा घालावा. कांदा गुलाबी रंगावर परतला की त्यामध्ये टोमॅटो घालावेत. त्यानंतर त्यामध्ये पावभाजी मसाला, लाल तिखट, हळद घालावी. मसाले परतले की, चिकन सोसेज घालावेत. चिकन सोसेज 10 मिनीटे शिजले की त्यामध्ये शिजवून घेतलेला मोकळा भात अंदाजाने घालावा. त्यावर कोथंबीर घालून सर्व्ह करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT