General Knowledge esakal
लाइफस्टाइल

General Knowledge : पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या जीन्स पँटचा खिसा छोटा का असतो? कारण वाचून व्हाल थक्क

महिलांच्या जीन्स पँटचे खिसे पुरुषांच्या तुलनेत लहान का असतात. खरंतर यामागे एक मोठं रहस्य आहे, ते जाणून तुम्हाला धक्का बसेल

साक्षी राऊत

General Knowledge : ऑफिसपासून ते बाहेर कुठेही जायचे असल्यास अनेकांचा कंफर्ट ज्या कपड्यात बसतो तो म्हणजे जीन्स. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आणि महिलांपासून पुरुषांपर्यंत सर्वजण जीन्स पॅन्ट घातलेले दिसतात. पण तुम्ही कधी हे लक्षात घेतले आहे का की महिलांच्या जीन्स पँटचे खिसे पुरुषांच्या तुलनेत लहान का असतात. खरंतर यामागे एक मोठं रहस्य आहे, ते जाणून तुम्हाला धक्का बसेल. चला तर यामागे नेमकं काय सीक्रेट आहे ते आज आपण जाणून घेऊया.

जींन्सचं स्ट्रक्चर

गारमेंट तज्ञांच्या मते, बहुतेक जीन्स मध्ये लाइक्रा स्ट्रेच नावाचे फॅब्रिक असते. अशात या पँटला खिसा बनवल्या गेल्यास पँट स्ट्रेच होतो ज्यामुळे पँट फाटण्याची शक्यता वाढते. महिलांच्या पँटचे खिसे छोटे असण्यामागे हे एक मोठं कारण असू शकतं.

शरीराचा आकार

बहुतेक स्त्रियांची कंबर वक्र आणि लहान असते. अशा परिस्थितीत महिलांची शरीरयष्टी नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांच्या जीन्स पँटचा खिसा छोटा ठेवला जातो. जेव्हा पँटचा खिसा लांब असतो तेव्हा त्यात लेयर्स दिसतात, ज्यामुळे तुमची फिगर ओबड धोबड दिसण्याची शक्यता असते. म्हणूनच अनेक कंपन्या जीन्स पँटमध्ये लहान खिसे बनवल्या जातात. (Lifestyle)

स्वस्त जीन्स

गारमेंट उद्योगाशी संबंधित लोकांच्या मते, महिलांच्या जीन्स पँटमध्ये खिसा लहान असण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे असे केल्याने खर्च वाढतो. खरे तर खिसा मोठा करण्यापेक्षा मोठे कापड त्यासाठी वापरावे लागते. तर एक छोटासा खिसा लावून त्या कापडाची बचत होते. त्यामुळेच बहुतांश कंपन्या खर्च कमी करण्यासाठी छोटे खिसे टाकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT