Dating App sakal
लाइफस्टाइल

Dating App : लग्न झालंय तरी डेटींगचा नाद जाईना! इतक्या भारतीयांनी डाउनलोड केलं आहे हे खास ॲप

यापैकी 20% म्हणजेच सुमारे 20 लाख युजर्स भारतातील आहेत.

सकाळ डिजिटल टीम

फ्रान्स बेस्ड एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंग ॲप ग्लीडन दिलेल्या माहितीनुसार, जगभरात 10 मिलियन युजर्स त्यांचं ॲप वापरतात. यापैकी 20% म्हणजेच सुमारे 20 लाख युजर्स भारतातील आहेत.

कंपनीच्या मते, सप्टेंबर 2022 पासून हा आकडा 11 टक्क्यांनी वाढलाय. कंपनीने म्हटलंय की, बहुतेक नवीन युजर्स (66 टक्के) टियर 1 शहरांतील आहेत. तर उर्वरित (44 टक्के) टियर 2 आणि टियर 3 शहरांमधील आहेत. (Gleeden Dating App for Married people)

ग्लीडनवर ॲक्टीव्ह असणारे बहुतांश भारतीय युजर्स हे उच्च सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमी असलेले आहेत असा दावा या ॲपने केलाय. यात बरेच युजर्स इंजिनियर, डॉक्टर, उद्योजक, सल्लागार, व्यवस्थापक, अधिकारी यासारखे व्यावसायिक आहेत.

आकडेवारीच सांगायचं झालं तर भारतीय गृहिणी मोठ्या प्रमाणात या ॲपवर ॲक्टीव्ह आहेत. वयाबद्दल बोलायच झालं तर यातील बहुतांश पुरुषांच वय 30 वर्षांपेक्षा जास्त आहे. तर महिलांचे वय 26 वर्षांपेक्षा जास्त आहे.

Gleeden App

कंपनीने पुढे दावा केलाय की या ॲपमध्ये महिलांसाठी अतिरिक्त सुरक्षितता देण्यात आली आहे. 2023 मध्ये 60 टक्के पुरुष आणि 40 टक्के महिला युजर्स ॲपवर ॲक्टीव्ह होत्या.

कंपनीने म्हटलंय की, हे ॲप विवाहित लोकांसाठी डिझाइन करण्यात आलंय. ग्लीडनवर भारतीय युझर्सची संख्या पाहता देशात एकपत्नीत्वाच्या पारंपरिक संकल्पना हळूहळू बदलत असल्याचं कंपनीने म्हंटलय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT