glow on face increased try some homemade face pack in kolhapur
glow on face increased try some homemade face pack in kolhapur 
लाइफस्टाइल

चेहऱ्याचा ग्लो वाढवायचा आहे ? मग हे घरगुती फेसपॅक नक्की ट्राय करा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकला उजळती त्वचा हवी असते, पण हे वाढते प्रदूषण आणि ऊन, धूळ या कारणांमुळे त्वचेच्या काही समस्या उद्भवू शकतात. या वाढत्या प्रदूषणामुळे आपली त्वचा काळी पडू शकते. त्वचेच्या आरोग्यासाठी लोकं खूप महागड्या सोंदर्य प्रसाधनांचा वापर करतात, पण  बऱ्याचदा त्यातूनही काही फरक जाणवत नाही, त्यामुळे बरेचजण निराशा होतात, पण तुम्हाला निराश होण्याची बिलकुल गरज नाही.

काळपट त्वचा ही घरगुती उपायांनीही ठीक होऊ शकते, बऱ्याच घरगुती उपायांनी तुम्ही त्वचेची समस्या दूर करू शकता पण सफरचंदाच्या तुकडे त्वचेचा काळपटपणा दूर करण्यास मदत करते. यामुळे त्वचेवर एक वेगळीच चमक तुम्हाला पाहायला मिळेल. तेव्हा आता आपण जाणून घेवूया की सफरचंदाच्या तुकड्यांचा कशा पद्धतीने वापर करावा?

- पहिल्यांदा हे मिश्रण तयार करण्यासाठी सफरचंदाचे तुकडे उन्हात वाळवून घ्यावे.
- सफरचंदाचे तुकडे चांगले वाळल्यानांतर त्याची मिक्सर मध्ये बारीक पावडर करून घ्यावी.
- त्यानंतर वाटीमध्ये 2 चमचे कच्चे दूध आणि ही सफरचंदाची पावडर यांचे एकत्र मिश्रण करून घ्यायचे.
- हे एकत्रित मिश्रण आपल्या मानेपासून ते चेहऱ्यापर्यंत लाऊन घ्यावे.
- 25 मिनिटं हे चेहऱ्यावर लावून ठेवावे, ते सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा.
- आठवड्यातून तीन वेळा हे लावल्याने आपली त्वचा तुम्हाला उजळलेली पाहायला मिळेल.

टोमॅटो आणि सफरचंदाचे फेसपॅक

टोमॅटो सोबत सफरचंदाच्या तुकड्यांची पेस्ट तयार करून 2 ते 3 सफरचंदाचे तुकडे करू घ्या, आणि त्यासोबत 1 टोमॅटो असे मिक्सरमध्ये हे मिश्रण एकत्रित करून घ्यावे. आणि 20 मिनीट ते आपल्या चेहऱ्यावर लावावे, त्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवावा. हा फेसपॅक आठवड्यातून 2 वेळा लाववा. त्यामुळे तुमच्या त्वचेवर एक वेगळीच चमक तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचबरोबर तुमच्या त्वचेवरील पिंपल्स आणि काळे डाग दूर झालेले दिसतील.

सफरचंदाच्या तुकड्यांपासून होणारे फायदे :

काही संशोधनानुसार सफरचंदाचे तुकडे  हे कॅल्शियम, फॉस्फरस, पोटेशियम, फालेट आणि आयरन सारखी त्वचेची प्रचुरता होते. ही सर्व तत्व आपल्या स्वास्थसाठी बरेच फायदेशीर आहेत हे सिद्ध होऊ शकते. कॅल्शियम आणि फॉस्फरस हे हाडे मजबूत करण्यासाठी गुणकारी असतात. त्याचबरोबर ह्यामध्ये अँटी- ऑक्सीडेंट पण भरपूर असते. जे त्वचेचा किटाणूंपासून बचाव करत असते. ह्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे, ते आपल्याला पचन आणि पोटाच्या अन्य समस्यांपासून वाचवते. त्वचेवर असलेले वेगवेगळ्या डागांच्या अडचणीतून दूर करते. चेहऱ्यावर असलेल्या काळपट डागांना दूर करण्यास मदत करते.

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT