Glowing Skin Tips  esakal
लाइफस्टाइल

Glowing Skin Tips : गुलाबी गालांची अदा करी फिदा; गोबरे गाल हवेत तर अशी ठेवा लाइफस्टाइल

घरी नैसर्गिकरित्या ग्लोइंग गाल कसे मिळवायचे

Pooja Karande-Kadam

Glowing Skin Tips : तुम्ही सुंदर दिसावे आणि लोकांनी तुमच्याकडेच पहावे असे कोणाला वाटत नाही? पण, आता नॅचरल सौंदर्य राहीलेच नाही. त्यामुळे पार्लरचा ग्लो आहे तोवर सगळे कौतुक करतात. अन् ग्लो निघून गेला की सगळे विचित्र नजरेंनं पाहतात.

सध्या सगळ्यांनाच इन्स्टंट ग्लो हवाय. त्यामुळे प्रत्येकजण अनेक पर्याय शोधत असतो. त्यासाठी अगदीच जलद ऑप्शन म्हणून मेकअपकडे पाहिले जाते. मेकअपमुळे तुम्हाला इंस्टंट ग्लो मिळतो पण त्याचा अतीवापर तुमच्या त्वचेसाठी घातक ठरतो.

या कामात तुम्ही तुमच्या जीवनशैलीत काही टिप्स समाविष्ट करून सुंदर आणि गुलाबी गाल मिळवू शकता. त्यामुळे हे कसे शक्य आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, तुम्हाला फक्त त्वचेतील रक्ताभिसरण वेगवान करायचं आहे आणि यासाठी तुम्ही या टिप्स वापरून पाहू शकता. (Glowing Skin Tips : Increase the blood circulation of your skin to get rosy cheeks, do these easy things)

घरी नैसर्गिकरित्या ग्लोइंग गाल कसे मिळवायचे

भरपूर पाणी प्या

आता पाणी पिऊन गुलाबी गाल कसे येतात असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की रक्ताभिसरण सुरळीत करण्यासाठी रक्तात पुरेसे पाणी असणे आवश्यक आहे.

म्हणजेच तुमच्या रक्तातील लाल रक्तपेशी निरोगी असाव्यात आणि रक्तात द्रवपदार्थाचे प्रमाण असावे जेणेकरून त्यांची हालचाल चांगली होईल. तुमच्या संपूर्ण शरीरातून रक्त तुमच्या चेहऱ्यापर्यंत पोहोचते.

आहारात फळांचा समावेश करा

असे बरेच लोक आहेत जे एका दिवसात एक फळ देखील खात नाहीत, तर अशा लोकांची त्वचा निस्तेज होऊ शकते. कारण फळांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात असतात. यामुळे फळांना जिथे रंग मिळतो तिथे ते खाल्ल्याने तुमचे गाल गुलाबी होऊ शकतात.

याशिवाय हे अँटीऑक्सिडंट रक्ताभिसरण वेगवान होण्यास मदत करतात. त्यामुळे सफरचंद, स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, केळी, टरबूज आणि इतर रसाळ फळांचा आहारात समावेश करा.

चेहऱ्याचे व्यायाम आणि योगा करा

तुम्ही चेहऱ्याचे व्यायाम करून तुमच्या त्वचेतील रक्ताभिसरण वाढवू शकता, जसे की तुमचे गाल आणि ओठ आतून खेचणे आणि रोलर व्यायाम. याशिवाय, तुम्ही तुमच्या त्वचेची छिद्रे उघडून त्यांना आतून डिटॉक्स करणे महत्त्वाचे आहे आणि या कामात योग तुम्हाला मदत करू शकतो.

विशेषतः श्वासोच्छवासाचा व्यायाम. त्यामुळे, जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारायचे असेल, तर तुम्ही या सोप्या टिप्स वापरून पाहू शकता. (Beauty Tips)

पुरेसा आहार

चांगला संतुलित आहार घेणे आपल्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय फायदेशीर असते. इतकेच नाही तर दिवसातून ठरलेले नाश्ता, दुपारचे जेवण, चहाच्या वेळचे खाणे आणि रात्रीचे जेवण या चार गोष्टी आवर्जून घ्यायलाच हव्यात. यामुळे तुमचे आरोग्य आणि पर्यायाने तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत होते.

मसाज

अनेकदा आपण इतके थकतो की आपल्या शरीराचे काही अवयव दुखत असतील त्यांचा रक्तप्रवाह योग्य पद्धतीने होत नसेल असेही आपल्याला वाटत नाही. पण आपण कधी आपल्या गालांना गोलाकार मसाज केल्यास आपल्याला खूप छान वाटते.

आणि याठिकाणचे स्नायू मोकळे होण्यास मदत होते. त्यामुळे गालाला गोलाकार आणि उलट्या दिशेने मसाज करणे ते लाल-गुलाबी होण्यासाठी फायदेशीर ठरु शकते. (Face Care Tips)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejas Fighter Jet Crash: वडील युट्यूबवर एअर शोचे व्हिडिओ स्क्रोल करत होते... तेवढ्यात विंग कमांडर मुलाच्या मृत्यूची बातमी कळली

Latest Marathi News Live Update : राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता; हवामान विभागाचा अंदाज

Ind vs SA 2nd Test : रिषभ पंतच्या नेतृत्वाची 'टेस्ट'! आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरा कसोटी सामना, मायदेशातील प्रतिष्ठा पुन्हा पणास

Pune Book Festival : पुणे पुस्तक महोत्सवाचा श्रीगणेशा; फर्ग्युसनच्या मैदानावर १३ ते २१ डिसेंबरपर्यंत साहित्य मेळा

बाबो ही तर सेम आलियाचं दिसते! ऊत सिनेमातील आर्या सावे म्हणाली, 'पण माझी आवडती अभिनेत्री...'

SCROLL FOR NEXT