Gold Rate esakal
लाइफस्टाइल

Gold Rate: ६३ रूपयाला १० ग्राम; स्वातंत्र्यपूर्व काळात माती मोल होतं सोनं

आता एवढा दर असता तर प्रत्येकाने किलो किलो सोनं घेऊन ठेवलं असतं

सकाळ डिजिटल टीम

सोनं घेणं सर्वसामान्य माणसांच्या खिशाला परवडेना झालंय. रोज त्याचे दर गगनाला भिडत आहेत. सध्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत ५८ हजारांच्या आसपास आहे. सोन्याच्या दराचे जाणकार सांगतात की, येत्या काळात सोने ६० हजारांचा टप्पा पार करणार आहे.

केवळ सोने नाही तर चांदीच्या दरातही वाढ दिसून येत आहे.  एवढ्या महागड्या किमतीत मिळणारे सोने जुन्या काळी कोणत्या किमतीला मिळायचे, याचा कधी विचार केला आहे का? स्वातंत्र्यपूर्व काळात सोने ६३ रूपयांना १० ग्राम मिळत होते. हे ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे.

हि गोष्ट आहे १९६३ ची, त्यावेळी सोन्याचे भाव कमीत कमी ४५ आणि जास्तीत जास्त केवळ ६३ होते. सध्याच्या तूलनेत हे दर कमी वाटत असले तरी त्याकाळातील गरीबीमूळे लोकांना ते घेणंही परवडायचं नाही. .

स्वातंत्र्याच्या वेळी सोन्याचा भाव ८८.६२ रुपये होता. इंडियन पोस्ट गोल्ड कॉईन सर्व्हिसेसच्या मते, देश पारतंत्र्यात असताना १९४२ मध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत 44 रुपये होती. तर, १९४७ वेळी सोन्याचा दर वाढून ८८.६२ रुपयांपर्यंत पोहोचला होता.

स्वातंत्र्यानंतर, सोन्याच्या किमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण पाहिली तर ती १९६४ मध्ये झाली होती. जेव्हा सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम रु.६३.२५ पर्यंत कोसळले होते.

काही दिवसांपूर्वीच १९५९ च्या सोन्याच्या दागिन्यांचे बिल व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ६३ वर्षांपूर्वी सोन्याची किंमत ११३ रुपये प्रति १० ग्रॅम होती. हे बिल महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील आहे. या बिलात दुकानदाराचे नाव मेसर्स वामन निंबाजी अष्टेकर असे लिहिले आहे.

तारखेच्या रकान्यात 3 मार्च 1959 लिहिले आहे. शिवलिंग आत्माराम असे सोने खरेदी करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. बिलावर दोन प्रकारचे सोन्याचे दागिने खरेदी करण्यात आले आहेत. एकाची किंमत ११३ नुसार ६२१ रुपये, तर दुसऱ्याची किंमत २५१ रुपये आहे.

त्या व्यक्तीने चांदीची खरेदीही केली आहे. बिलात एकूण देय रक्कम ९०९ रुपये लिहिली आहे. हे बिल ६० वर्ष जुने आहे, जे खूप व्हायरल होत आहे.

६० वर्ष जूने बिल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात संतापजनक घटना! धावत्या कारमध्ये वकील महिलेवर अत्याचार, नेमकं काय घडलं?

मालिकेतील वडिलांनीच खऱ्या आयुष्यात केलेलं मिताली मयेकरचं कन्यादान; म्हणाले, 'मला मुलं नाहीत पण...'

Solapur Jangam Samaj : जनगणनेत 'हिंदू' म्हणूनच नोंद करणार; जंगम समाजाचा निर्धार, शिवाचार्यांविरोधी वक्तव्याचा एकमुखाने निषेध

Paithan News: यंदाच्या नालेसफाईवर विशेष लक्ष द्यावे; पैठण पालिकेकडून अपेक्षा : वरवरच्या स्वच्छतेऐवजी गाळ काढण्याची गरज

Panchgani Pinewood School: पाचगणीतील पाईनवुड इंटरनॅशनल स्कूलची मान्यता धोक्यात; शिक्षण विभागाची मोठी कारवाई, मान्यता रद्दीची शिफारस..

SCROLL FOR NEXT