Golden Pani Puri
Golden Pani Puri  esakal
लाइफस्टाइल

Golden Pani Puri : पठ्ठ्यानं सोन्या-चांदीपासून बनवली पाणीपुरी, खायची की तिजोरीत ठेवायची?

सकाळ डिजिटल टीम

Golden Pani Puri :

आजवर तुम्ही पाणीपुरीचे अनेक प्रकार पाहिले असतील. चॉकलेट पाणीपुरी, आलु मटार पाणी पुरी असेही तिचे प्रकार आहेत. तर पुचका, गोलगप्पा अशी काही नावेही पाणीपुरीला आहेत. आज आम्ही तुम्हाला सोन्या-चांदीची पाणीपुरीबद्दल सांगणार आहोत. सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थितीत सोन्या आणि चांदीची पाणीपुरी आहे असे तुम्हाला कोणी सांगितले तर विश्वास बसेल का?

इतकी महाग पाणीपुरी खाणार तरी कोण ? ती खावी की लॉकरमध्ये ठेवावी असेही बोलले जात आहे. ही पाणीपुरी कशी बनते याबद्दल एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊ. (Golden Pani puri)

Cherishing the taste या सोशल फुड व्लॉग अकाऊंटवरून या सोन्या-चांदीच्या पाणीपुरीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. केवळ पुरी सोन्याची आहे असे नाहीतर या पाणीपुरीत वापरले जाणारे पदार्थही शाही आहेत. या पाणीपुरीत काजू-बदाम आणि वरून मध आणि थंडाई घातली जाते. पाणीपुरी तयार झाली की सोन्या-चांदीचा वर्क लावला जातो.  

हा पाणीपुरीचा स्टॉल बेंगळुरूमध्ये आहे. तिथल्या लोकल स्ट्रिट मार्केटमध्ये सोन्याची पाणीपुरी मिळते. या व्हिडिओला लोकांची पसंती मिळाली आहे.  

तर काही लोकांनी या पाणीपुरीला बप्पी लेहरी यांची पाणीपुरी आहे असे म्हटले आहे, तर एका युजरने तुम्ही पाणीपुरीला हिऱ्या-मोत्यांनी सजवा पण खरी पाणीपुरी खाण्याची मजाही रोडवरच आहे, असे म्हटले आहे.  

 तर एका युजरने, पाणीपुरीला पाणीपुरीच राहूदेत, तिला राजवाड्याची राणी बनवू नका असे म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलं हवीत की ‘रील स्टार’?

मानवी अस्तित्वाचा वास्तव शोध!

महिला धोरणांचा प्रवास

अनुभवात्मक शिक्षण हवेच!

प्लास्टिक प्रदूषणमुक्ती... एक जागतिक दिवास्वप्न!

SCROLL FOR NEXT