Golden Village esakal
लाइफस्टाइल

Golden Village : भारतातल्या या गावात मृग नक्षत्रात पडतो सोन्याचा पाऊस, शेतात, खोदकामात सापडतात सोण्याची नाणी

हे गाव ११ व्या शतकामध्ये या भागात शिलाहार राजा भोज याची राजधानी होती

Pooja Karande-Kadam

Golden Village :

या रस्त्यांवर पडला पैशांचा पाऊस,अशा मथळ्याच्या अनेक बातम्या तुम्ही सोशल मिडियावर पाहिल्या असतील. खरं तर बातमी अशी असते की, पैसे घेऊन जाणारी गाडीचा अपघात झाला आणि त्यातून दोन-दोन हजाराच्या नोटा बाहेर पडल्या. या घटनेमुळे लोकांना वाटलं की पैशांचा पाऊस पडला. पण तुम्हाला माहिती आहे का? की आपल्या देशात असं एक गाव आहे जिथे सोन्याच्या नाण्यांचा पाऊस पडतो.

होय, तुम्ही बरोबर ऐकलंत आपल्या जवळपासच असं एक गाव आहे जिथे लोकांना शेतात काम करताना, घराच्या कामासाठी खोदकाम करताना अनेक सोन्याची नाणी सापडतात. ही किमया दरवर्षी मृग नक्षत्रावर पडणाऱ्या पावसाची वाट पाहतात. कारण, या पावसातच ही नाणी सापडतात अशी यांची भावना आहे.

हे गाव भारतात जगात भारी असलेल्या कोल्हापुर शहरातील आहे. शहरातील प्रसिद्ध अशा सातेरी डोंगराच्या पायथ्याशी कसबा बीड हे गाव आहे. या गावातील जमीन सोन्याच्या नाण्यांनी भरलेली आहे. त्यामागे एक ऐतिहासिक घटना आहे. त्याबद्दल आपण जाणून घेऊय़ात.

कोल्हापूर शहरापासून पंधरा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावात दरवर्षी मृग नक्षत्र ते स्वाती नक्षत्र या कालावधीत काही लोकांना शेतात,घराच्या कौलांवर,ऊसाच्या पातीवर अशा विवीध ठिकाणी सोन्याची नाणी अचानक सापडतात.

त्यावेळचे सम्राट शिलाहार राजा भोज

१० व्या ११ व्या शतकामध्ये या भागात शिलाहार राजा भोज याची राजधानी होती. इसवी सनाच्या अकराव्या शतकात कोल्हापूर राज्यावर शिलाहार राजा भोज याचे राज्य होते. शिलाहार राज्याच्या राजधानीचा तोरा या गावाने मिरवला असल्याचे पुरावे आजही लोकांना सापडतात.

या ठिकाणी सापडणाऱ्या शेकडो विरगळी म्हणजेच दगडातील कोरीव मूर्ती सापडतात. त्या दगडांवर शुरवीर, युद्धकला यांचे चित्रण पहायला मिळते. तत्कालीन कोल्हापूर परिसरात या गावास विशेष असाधारण महत्त्व होते. राज्याची राजधानी असल्याकारणाने या ठिकाणी आर्थिक संपन्नता असणार यात मुळीच शंका घेण्याचे कारण नाही.

तेव्हा पासून दरवर्षी ही नाणी येथे सापडतात. नाण्यांवर असणाऱ्या चिन्हांवरून आणि काही अक्षरावरून ही नाणी शिलाहार राजांची असावीत असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. या प्रकारची नाणी भारतात अन्यत्र कुठेही सापडत नाहीत.

या नाण्यांचा प्रकार दुर्मिळ असुन ज्या प्रकारे ही सापडतात ते या नाण्यांचे वैशिष्ट्यच म्हणावे लागेल.महत्वाचे म्हणजे ही नाणी बीड गावच्या वेशीतच सापडतात. या गावात प्राचीन महादेवाचे मंदिर व खुप वीरगळी देखील पहायला मिळतात.

बीडात सोन्याचा पाऊस पडतो अशी म्हणायची पद्धत आहे या गावात मिळालेली सोन्याची नाणी लोकं आपल्या देवघरात श्रध्देने पुजतात. सहसा ही नाणी कोणीही विकत नाहीत.

कशी आहेत नाणी

या भागात साधारण चार-पाच प्रकारची नाणी सापडतात. यापैकी काही नाण्यांवर एका बाजूस त्रिशुळ,फुल व दुसऱ्या बाजूस तुरीच्या डाळी सारखा प्लेन उंचवटा असतो. काही नाण्यांवर एका बाजूस मधे त्रिशुळ त्याच्या एका बाजूस चंद्र सुर्य व दुसऱ्या बाजूस शिवलिंग असते. त्याच्या मागील बाजूस पाय मुडपून बसलेला गरुड व त्याच्या हातात धरलेला साप असतो. ही नाणी ०.१०० ते ०.८०० मिलीग्रॅम वजनाची असल्याचे गावकरी सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT