Men's Fashion Tips: Sakal
लाइफस्टाइल

Men's Fashion Tips: तुम्हीच व्हाल पार्टीची जान अन् शान... फक्त तयार होताना फॉलो करा 'या' टिप्स

Men's Fashion Tips: मुलांनी देखील पार्टीला जाण्यापुर्वी कशी तयार करावी हे जाणून घेतले पाहिजे.

Puja Bonkile

grooming party look men should follow these tips

जेव्हा मुलींना पार्टीला जायचं असतं, तेव्हा काही दिवस आधीच तयारी करायला लागतात. मग ते ड्रेस असो किंवा दागिने, सर्व काही अगदी खास असते. ज्वेलरी आणि आउटफिट्ससोबतच मुली चमकदार त्वचेसाठी पार्टीच्या काही दिवस आधी त्वचेची काळजी घेतात. यामुळे त्यांची त्वचा चमकदार राहते.

त्याचप्रमाणे मुलांनी देखील पार्टीला जाण्यासाठी चांगले कपडे, शूज आणि हेअस्टाइलकडे लक्ष देणे पुरेसे नाही. पार्टीला जाण्यापूर्वी तुम्ही पुढील काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

केस कापावे

पार्टीला जाण्यापूर्वी तीन ते चार दिवस आधी केस कापून घ्यावे. आपले केस व्यवस्थित सेट करावे. जेणेकरून पार्टीच्या दिवशी तुमचा लूक परफेक्ट दिसेल.

स्क्रब करावे

पार्टीला जाण्यापूर्वी एक दिवस आधी तुमची त्वचा योग्य प्रकारे स्क्रब करावी. यामुळे त्वचेवरची डेड स्किन निघून जाईल आणि चेहरा चमकदार आणि स्वच्छ दिसेल.

मॉइश्चरायझर लावावे

पार्टीसाठी तयार होण्यापूर्वी त्वचेवर मॉइश्चरायझर लावावे. जर तुम्ही मॉइश्चरायझरचा वापर केला नाही तर तुमची त्वचा कोरडी दिसू शकते.

हलका मेकअप

मेकअप फक्त मुलींच नाही तर मुल देखील करू शकतात. तुम्ही पार्टीला जाण्यापूर्वी हलका मेकअपही करू शकता. लक्षात ठेवा जास्त मेकअप करू नका, त्यामुळे तुमचा लुक खराब होऊ शकतो.

लिप बाम

लिप बाम व्यवस्थित लावल्यानंतरही जर तुमचे ओठ कोरडे राहिले तर तुमचा लूक खराब दिसू शकतो. यामुळे लिप बाम नेहमी जवळ ठेवावा आणि त्याचा वापर करत राहा.

शीट मास्क वापरावा

पार्टीच्या दिवशी शीट मास्क वापरावा. पार्टीच्या काही तास आधी शीट मास्कचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्याचा थकवा कमी होईल आणि तुमचा चेहरा चमकदार होईल.

दातांची स्वच्छता

पार्टीला जाण्यापूर्वी दात स्वच्छ करावे. यामुळे तुमच्या तोंडातून येणारा दुर्गंधही कमी होईल आणि दातांमध्ये कुठेतरी अन्न अडकले असेल तर तेही बाहेर येईल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जयपूरमध्ये थरार! १२० किमीचा वेग, मद्यधुंद चालक अन् दोन कारमध्ये शर्यत; 'ऑडी'नं 16 जणांना उडवलं

सोनाली बेंद्रेने केलं दशावतार सिनेमाचं कौतुक ; "आपल्या संस्कृतीशी घट्ट नातं सांगणाऱ्या कथा.."

Latest Marathi News Live Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Agricultural News : द्राक्षांची पंढरी संकटात! अतिवृष्टीमुळे निफाड तालुक्यातील ७० टक्के बागांना फळधारणाच नाही

TRAI चा दणका! स्पॅम कॉल्ससाठी जिओ,एअरटेल,Vi वर १५० कोटींचा दंड; युजर्सच्या 'या' फायद्यासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT