Gudi Padwa 2024 esakal
लाइफस्टाइल

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्याला पाहुण्यांसाठी घरच्या घरी झटपट बनवा अननसाचा शिरा, वाचा ही सोपी रेसिपी

Gudi Padwa 2024 : आज घरोघरी गुढी उभारली जाते, गुढीची पूजा केली जाते आणि गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Gudi Padwa 2024 : देशात आज गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. महाराष्ट्रात खास करून या सणाची मोठी धामधूम पहायला मिळते. कारण, गुढीपाडव्यापासूनच मराठी नववर्षाला सुरूवात होते. हिंदू पंचांगानुसार, भारतात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो.

या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. या गुढीची पूजा केली जाते आणि गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो. काही ठिकाणी पुरणपोळी तर काही घरांमध्ये श्रीखंड-पुरीचा बेत आखला जातो. थोडक्यात आजच्या दिवशी विविध प्रकारचे गोड पदार्थ बनवले जातात आणि एकमेकांच्या घरी जाऊन त्यांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात.

आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही देखील काहीतरी गोड परंतु, हटके पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल तर अननसाचा शिरा बनवून पाहा. या शिऱ्याची सोपी रेसिपी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात अननसाच्या शिऱ्याची सोपी रेसिपी.

अननसाचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य :

  • अर्धा कप रवा

  • अर्धा कप तूप

  • अर्धा कप अननसाची प्युरी

  • अर्धा कप साखर

  • चिमूटभर केशर

  • १ कप गरम पाणी

  • १ चमचा वेलची पूड

  • २ चमचे काजू-बदामचे तुकडे

अननसाचा शिरा बनवण्याची सोपी पद्धत :

  • सर्वात आधी गॅसवर एका पॅनमध्ये किंवा कढईमध्ये तूप घालून मध्यम आचेवर गरम करायला ठेवा.

  • कढई गरम झाली की त्या तुपामध्ये रवा छान भाजून घ्या.

  • रवा सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर, या रव्यामध्ये अननसाची प्युरी टाका आणि हे मिश्रण चांगले एकजीव करून घ्या.

  • आता या मिश्रणात साखर घालून हे शिऱ्याचे मिश्रण ५-१० मिनिटे चांगले शिजू द्या.

  • आता या मिश्रणातील साखर विरघळल्यानंतर त्यामध्ये १ कप गरम पाणी मिसळा. त्यानंतर, शिरा चांगला शिजू द्या.

  • आता शिरा शिजल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर केशर, बदाम-काजूचे बारीक केलेल तुकडे, वेलची पूड घालून शिरा १ मिनिट शिजू द्या.

  • आता तुमचा गरमागरम अननसाचा शिरा तयार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: मुंबईत वाहतुकीस अडथळा आणणार नाही, मराठ्यांनी कसं केलं नियोजन, सरकारही फेल

भरसभेत पंतप्रधान मोदींच्या आईला शिवीगाळ; मोहम्मद रिझवींनी वापरले अपशब्द, भाजपची काँग्रेसविरोधात आक्रमक भूमिका

Lionel Messi Retirement: लिओनेल मेस्सीचे निवृत्तीचे संकेत! घरच्या मैदानावर शेवटचा सामना खेळणार, संपूर्ण परिवार उपस्थित राहणार

Pune News : पुण्यात कॅबचालकांसाठी 'अभय' योजना सुरू; प्रवांशांकडून वाढीव शुल्क आकारणाऱ्यांवर कारवाई नाहीच

हुंड्यामुळे दर 24 तासांनी 20 महिलांचा मृत्यू! निक्की भाटीच्या मृत्यूने उलघडले गूढ; NCRB च्या आकडेवारीतून भयानक वास्तव समोर

SCROLL FOR NEXT