Gudi Padwa 2024 esakal
लाइफस्टाइल

Gudi Padwa 2024 : गुढीपाडव्यानिमित्त दहा मिनिटांमध्ये काढा ‘या’ आकर्षक रांगोळ्या, तुमच्या अंगणाला येईल शोभा

Gudi Padwa 2024 : सध्या सगळीकडे गुढीपाडव्याची धामधूम पहायला मिळतेय. महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Gudi Padwa 2024 : सध्या सगळीकडे गुढीपाडव्याची धामधूम पहायला मिळतेय. हिंदू नववर्षाची सुरूवात ही गुढीपाडव्याच्या सणाने होते. महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार, भारतात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदेला अर्थात वसंत ऋतुच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो.

यंदा हा गुढीपाडवा ९ एप्रिलला (मंगळवारी) देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त घराची स्वच्छता केली जाते, दारापुढे गुढी उभारली जाते. गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच, गुढीसमोर सुंदर अशी रांगोळी काढली जाते. आज आम्ही तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त अंगणात किंवा गुढीसमोर काढण्यासाठी काही सुंदर रांगोळ्यांच्या डिझाईन्स दाखवणार आहोत.

गुढीच्या डिझाईनची काढा रांगोळी

गुढीपाडव्याच्या दिवशी खास करून गुढीची रांगोळी काढली जाते. तुम्ही काठी किंवा पट्टीच्या मदतीने गुढीच्या काठीची डिझाईन काढू शकता.

Gudi Padwa 2024

त्यानंतर, त्यावर कलश काढून गुढी सजवतो, त्याप्रमाणे डिझाईन काढून घ्या. त्यानंतर, त्यावर रंगोबेरंगी रंगाचा वापर करून तुमची रांगोळी आकर्षक बनवा.

फुलांची आणि कलशाची रांगोळी

गुढीसमोर जर तुम्हाला गुढीची रांगोळी न काढता काहीतरी वेगळी रांगोळी काढायची असेल तर तुम्ही अशा प्रकारे कलश आणि फुलांच्या डिझाईनची सुंदर रांगोळी काढू शकता.

Gudi Padwa 2024

रांगोळीमध्ये मध्यभागी कलश काढून त्याच्या आजूबाजूने तुम्हाला हव्या त्या आकाराची फुलांची डिझाईन काढा आणि तुमच्या आवडीप्रमाणे त्यामध्ये विविध रंग भरा. ही रांगोळी अवघ्या १० ते १५ मिनिटांमध्ये तुम्ही काढू शकता.

बोटांच्या आणि ठिपक्यांच्या (डॉटच्या) मदतीने काढा रांगोळी

ही रांगोळी दिसायला जितकी सुंदर दिसते, तितकीच ही रांगोळी काढायला अतिशय सोपी आहे. तुम्हाला केवळ ठिपक्यांच्या मदतीने रांगोळीची बॉर्डर काढून घ्यायची आहे. ही बॉर्डर काढून झाल्यावर तुम्ही आतमध्ये गुढी पाडव्याच्या शुभेच्छा असे ही लिहू शकता, किंवा ठिपक्यांच्या मदतीने वेगळी डिझाईन काढू शकता. आता यामध्ये तुमच्या आवडीचे रंग भरा आणि रांगोळीला आकर्षक लूक द्या. हवे असल्यास तुम्ही बाजूने मेणबत्ती देखील ठेवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT