Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : केसांना कंडिशनर लावताय? मग, ‘या’ गोष्टींची घ्या खास काळजी

Hair Care Tips : कंडिशनरचा वापर तुम्ही योग्य पद्धतीने केला नाही, तर केस मोठ्या प्रमाणात गळू शकतात.

Monika Lonkar –Kumbhar

Hair Care Tips : देशातील काही भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून तर काही भागांमध्ये अजूनही उकाडा अद्याप आहे. वातावरणातील या दमट वातावरणाचा परिणाम आपल्या आरोग्यावर, केसांवर आणि त्वचेवर ही होतो. त्यामुळे, या दिवसांमध्ये केसांची, त्वचेची आणि आरोग्याची खास काळजी घ्यावी लागते. त्यासाठी, तुम्ही खास हेअर केअर रूटीन फॉलो करू शकता.

या हेअर केअर रूटीनमध्ये कंडिशनरचा समावेश जरूर करा. केसांना कंडिशनर लावल्याने केस मऊ होण्यास मदत होते. शिवाय, केसांना उत्तम पोषण मिळते आणि केसांमध्ये कोणत्याही प्रकारचा गुंता होत नाही. तुमच्ये केसांना लांब आणि चमकदार बनवण्यासाठी कंडिशनर फायदेशीर आहे.

परंतु, जर याचा वापर तुम्ही योग्य पद्धतीने केला नाही तर तुमचे केस मोठ्या प्रमाणात गळू शकतात. अशा परिस्थितीमध्ये आज आम्ही तुम्हाला केसांना कंडिशनर लावताना कोणती काळजी घ्यायची? त्याबद्दल सांगणार आहोत.

स्काल्पला (टाळू) कंडिशनर लावू नका

अनेक जण केसांना कंडिशनर लावताना ते स्काल्पला (टाळूला) ही लावतात. जर तुम्ही ही चूक करत असाल तर ती दुरूस्त करा. केसांच्या बटांनाच केवळ कंडिशनर लावा चुकूनही टाळूला ते लावू नका. यामुळे, तुमचे अधिक केस गळू शकतात. त्यामुळे, टाळूला कंडिशनर लावू नका फक्त केसांना लावा.

केसांचा प्रकार लक्षात घ्या

केसांना कंडिशनर लावताना तुमच्या केसांचा प्रकार काय आहे? ते आधी लक्षात घ्या. तुमचे केस जर तेलकट किंवा कोरडे असतील तर त्यानुसार तुमच्या केसांना सूट होणारे कंडिशनर केसांना अवश्य लावा. केमिकलयुक्त कंडिशनरचा वापर करण्यापेक्षा नैसर्गिक घटकांनी युक्त असलेले कंडिशनर केसांना लावा.

केसांच्या लांबीनुसार कंडिशनर लावा

काही लोकांना केसांमध्ये जास्त कंडिशनर लावण्याची वाईट सवय असते. खर तर तुमचे केस जितके आहेत, अगदी त्याच हिशोबाने तुम्ही केसांना कंडिशनर लावायला हवे. चुकूनही केसांना जास्त कंडिशनर लावू नका. जर तुम्ही केसांना जास्त कंडिशनर लावले तर केस निस्तेज आणि खराब होतात. त्यामुळे, केसांना लांबीनुसारच कंडिशनर लावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा, मध्यरात्री तरूणीला फार्महाऊसवर बोलवून गैरकृत्य

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT