hair care sakal
लाइफस्टाइल

Hair Care News : रात्री केसांना तेल लावून झोपल्याने कोणते फायदे होतात? जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला रात्री केसांना तेल लावल्याने कोणते फायदे होतात हे सांगणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

केस नेहमी निरोगी राहावेत यासाठी महिला त्यांच्या केसांची चांगली काळजी घेतात. महिला त्यांच्या केसांवर अनेक प्रकारची उत्पादने वापरत असतात, त्या अनेक उपाय देखील करतात. तसेच, या दोन गोष्टींचा वापर करताना केसांना तेल लावणे आवश्यक आहे जेणेकरून केसांची चांगली वाढ होईल आणि केस निरोगी राहतील. आज आम्ही तुम्हाला रात्री केसांना तेल लावल्याने कोणते फायदे होतात हे सांगणार आहोत.

केस सिल्की आणि चमकदार होतील

रात्री केसांना तेल लावल्याने केसांना योग्य पोषण मिळते आणि केस सिल्की आणि चमकदार होतात. त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावून मसाज करा. रात्री केसांना तेल लावल्यानंतर सकाळी शॅम्पू करा आणि त्यानंतर कंडिशनर देखील वापरा.

कोरडेपणाची समस्या दूर होईल

रात्री केसांना तेल लावल्याने कोरडेपणाची समस्या कमी होते आणि केस निरोगी राहतील. केसांना तेल लावल्याने केसांशी संबंधित समस्या कमी होतात, तसेच खाज येण्याची समस्याही टाळता येते.

केसांची वाढ चांगली होईल

रात्री केसांना तेल लावल्यास केसांची वाढ चांगली होते. याशिवाय केसही निरोगी राहतात. रात्री केसांना मसाज करून झोपा. सकाळी शॅम्पू करा आणि त्यानंतर कंडिशनर देखील वापरा.

तसेच, तुम्ही आंघोळीच्या एक तास आधीही केसांना तेल लावू शकता. यामुळे केस गळणे थांबेल आणि केस मजबूत होतील. जर तुम्ही रात्री केसांना तेल लावायला विसरले असाल तर, सकाळी धुण्याच्या एक तास आधी लावा. जर आपले केस फार गळत असतील तर, केस धुण्यापूर्वी तेल लावायला विसरू नका. यामुळे केस तुटणे, केस गळणे थांबेल आणि केस मजबूत होतील.

या गोष्टी लक्षात ठेवा

  • केसांना गरम तेल लावू नका

  • केसांना जास्त तेल लावू नका.

  • योग्य तेल निवडा.

  • केसांना कोंड्याची समस्या असल्यास ते लावू नका.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: माजी आमदार बाबाजानी दुर्रानी यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT