Hair Care Tips  esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : पांढरे केस अन् कोंड्याची समस्या झालीय कॉमन, हा आहे देशी उपाय!

केसांच्या प्रत्येक समस्येवर एकच रामबाण उपाय, पहा तो काय आहे

Pooja Karande-Kadam

Hair Care Tips : केसात कोंडा होणं, केस रूक्ष होणं आणि केसांना फाटे फुटणं या समस्या आता आपल्या केसांचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. प्रत्येकालाच या गोष्टींचा त्रास होत आहे. त्याचे कारण म्हणजे कामाचा ताण आणि बिघडलेली खाद्य संस्कृती होय.

केसांच्या या समस्या तुम्हालाही भेडसावत असतील तर त्यावर एक देशी उपाय आम्ही शोधला आहे. जो उपाय केल्याने तुमचे केस सॉफ्ट आणि शायनी होतील. तर तो कोणता उपाय आहे हे पाहुयात.

केसात लिंबू आणि नारळाचे तेल लावा

केसाला नुसते नारळाचे तेल लावून फायदा होत नाही. तर, त्यासोबत लिंबूही लावावा. याचे अनेक फायदे आहेत. चार चमचे नारळाचे तेल घ्या. त्यामध्ये दोन चमचे लिंबूचा रस घाला. आणि हे तयार मिश्रण केस धुण्याआधी एक तास केसांना लावा. आणि ते धुवून टाका.

याचे फायदे काय आहेत

नारळ तेलात ओमेगा फॅटी ऍसिड असतं. आणि लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे केसांची मुळे मोकळी होतात. आणि केसांना योग्य पोषण मिळतं. तसेच, केसांना नारळ लिंबू तेल लावल्याने रक्ताभिसरणही सुरळीत होते.

पांढऱ्या केसांसाठी

राखाडी केसांसाठी खोबरेल तेल आणि लिंबू राखाडी केसांसाठी खोबरेल तेल आणि लिंबू लावण्याचे अनेक फायदे आहेत. खोबरेल तेल आणि लिंबू एकत्र केसांमध्ये कोलेजन वाढवतात. चांगल्या रक्ताभिसरणाद्वारे पोषण प्रदान करतात. यामुळे पांढऱ्या केसांची समस्या दूर होते आणि केस काळे होण्यास मदत होते.

कोंडा कमी करते

कोंडा कमी करण्यासाठी खोबरेल तेल आणि लिंबू खोबरेल तेल आणि लिंबू अनेक प्रकारे काम करू शकतात. सर्वप्रथम, हे दोन्ही अँटी-बॅक्टेरियल आहेत जे केसांमधील कोंड्याची समस्या कमी करू शकतात. दुसरे म्हणजे, हे दोन्ही बुरशीविरोधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत जे कोंडा वर रामबाण उपाय आहेत. तर, या सर्व कारणांमुळे तुमच्या केसांमधील कोंड्याची समस्या त्रासदायक ठरू शकते.

नारळ तेल आणि केळी

केसांची लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी केळी फायदेशीर आहे. अर्धी केळी नारळ तेलात मिसळून हेअर पॅकप्रमाणे केसांना लावल्यास केसांची गुणवत्ता सुधारते. केस फुटण्याची समस्या दूर होते. हा पॅक केसांना सुमारे 30 मिनिटे लावा आणि केस धुवा.

केस मऊ ठेवण्यासाठी खास उपाय

केस धुतल्यानंतर वाळवले की ते जास्त कोरडे होतात. अशी समस्या असेल तर, केस ओले असल्यानंतर केसांमध्ये नारळ तेलाचे काही थेंब घाला. असे केल्याने हा ओलावा केसांमध्येच टिकून राहतो आणि केस मऊ होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT