Hair Care Tips  esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips : केसांना लावलेली मेहंदी तीन महिने टिकेल, फक्त भिजवताना ही पद्धत वापरा

प्रत्येक महिन्याच्या सामानाच्या यादीत हेअर डाय, मेहंदीही असतेच

Pooja Karande-Kadam

Hair Care Tips :

सणासुदीच्या दिवसात जशी गोड- धोड पदार्थ अन् घरातल्या सामानाची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. अगदी तशीच हेअर डाय, मेहंदीच्या पाकिटांचीही होतेच. हे डाय वापरण्याच महिला अन् पुरुष दोघेही आग्रही असतात. त्यामुळे प्रत्येक महिन्याच्या सामानाच्या यादीत हेअर डाय, मेहंदीही असतेच.

कारण केसांच्या पिकण्याचे, पांढरे होण्याचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे.  पिकलेले केस जगाच्या लाजेने का होईना पण लपवावेच लागतात. अन् त्यासाठी मेहंदीचा वापर करावा लागतो.

हेअर डायचा रंग महिनाभरातच उतरतो त्यामुळे प्रत्येक महिन्याला ते लावावेच लागतात. मेहंदी नॅचरल असली तरी तिचीही सेमच कंडिशन असते. तुम्हीही पिकलेल्या केसांना सतत मेहंदी लावून कंटाळला असाल तर एक ट्रिक आहे. जी तुम्हाला मदत करेल.

तुम्ही मेहंदी लावत असाल तर ती कशी भिजवायची याची एक ट्रिक पाहुयात. जिचा वापर केलात तर तुम्हाला तीन महिने तरी केसांकडे पहावे लागणार नाही.

मेहंदी अशी भिजवा

वेगळ्या पद्धतीने मेहंदी भिजवण्यासाठी तुम्हाला चहापूडीचे पाणी, १ चमचा हळद, सव्वा चमचा मेथी पावडर, १ चमचा मोहरीचे तेल या वस्तू लागतील.

मेहंदी पावडर एका लोखंडी कढईत काढून घ्या. त्यानंतर यात हळद, मेथी पावडर, मोहरीचे तेल घाला. मिश्रण एकजीव करून त्यामध्ये लागेल तसे चहाचे पाणी घाला.

२४ तास ठेवणे

हे मिश्रण लगेचच लावू नका. तर ते झाकून २४ तास लोखंडाच्या कढईत ठेवा. लोखंडामुळे मेहंदीचा रंग अधिकच खुलतो. त्यामुळे केसांवर लावल्यानंतर मेहंदीचा गंर जास्त दिवस केसांवर टिकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: चीनमध्ये उतरताच डोनाल्ड ट्रम्प यांचा अपमान! स्वागतासाठी शी जिनपिंग गैरहजर; ड्रॅगनकडून अमेरिका-चीन संबंधांबाबत नवा संकेत?

Prateek Yadav: प्रतीक यादवच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला पल्मोनरी थ्रोम्बोएम्बोलिझम काय? डॉक्टरला बोलावण्याचीही संधी मिळाली नाही...

RCB VS KKR LIVE: अजिंक्य रहाणेने वर्ध्याच्या पोट्ट्याला दिली पदार्पणाची कॅप... जाणून घ्या कोण आहे सौरभ दुबे? ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज

"नजरेत धग अन् रग..."ओळखलंत का 'रंगी'ला? १९ जूनला होतंय 'घबाडकुंड'चं दर्शन!

Pune News : थकबाकी न भरल्यास पथारी व्यावसायिक काळ्या यादीत; प्रशासनाचा इशारा

SCROLL FOR NEXT