Winter Hair Care Tips
Winter Hair Care Tips esakal
लाइफस्टाइल

Hair Care Tips: हिवाळ्यात अशी घ्या केसांची काळजी, कोंड्याच्या टेन्शनला करा बाय बाय

सकाळ डिजिटल टीम

Winter Hair Care Tips : हिवाळ्यात कोंड्याच्या समस्येचा अनेकांना सामना करावा लागत असतो. ही समस्या वारंवार डोकं वर काढत असते.पण हा कोंडा प्रामुख्यानं एका बुरशीमुळे होत असतो, हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल.

साधारणपणे आपल्या सर्वांच्याच त्वचेवर कोंडा हा नैसर्गिकरित्या असतोच. मात्र त्यापैकी अर्ध्या लोकांसाठी तो समस्येचं कारण ठरत असतो. त्यातही एक तृतीयांश लोकांमध्ये ही संख्या एवढ्या जास्त प्रमाणात वाढते की, त्यांचं बाहेर येणं जाणंही कठीण होतं.

कधीकधी वर्षानुवर्षे केसांमधील कोंडा कमीच होत नाही. केसांच्या छिद्रांमध्ये अडकून केस कमकुवत करण्यास तो कारणीभूत ठरतो.

कोंडा घालवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने आहेत, ती वापरल्यानंतरही कोंडा जाईल याची काही खात्री नसते. तुम्ही केसांमध्ये औषधे वापरता, तेव्हा आपल्याला इतर नुकसान म्हणजेच साईड इफेक्टही होऊ शकतात.

अशा परिस्थितीत आज आपण दोन अतिशय प्रभावी घरगुती उपाय जाणून घेऊयात, ज्याचा अवलंब करून तुम्ही केसांमधील कोंडा घालवू शकता.

कोरफड - केसांसाठी तुम्ही कोरफडीचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही एलोवेरा जेलमध्ये व्हिटॅमिन-ई कॅप्सूल मिक्स करून लावू शकता. त्यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते आणि कोंडाही निघून जातो

कांद्याचा रस - हिवाळ्यात कांद्याचा रस स्काल्पला लावू शकता. खोबरेल तेलात कांद्याचा रस मिसळा. याने काही वेळ डोक्याला मसाज करा. यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. हे कोंडा दूर करण्याचे काम करते.

दही - कोंडा दूर करण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता. यासाठी एका भांड्यात थोडे दही घ्या. त्यात एक चमचा मोहरीचे तेल घाला. या दोन्ही गोष्टी मिसळा आणि केस आणि स्काल्पला लावा. साधारण तासभर तसंच राहू द्या. यानंतर केस सौम्य शाम्पूने धुवा.

खोबरेल तेल - तुम्ही केस आणि स्कॅल्पसाठीही खोबरेल तेल वापरू शकता. यासाठी खोबरेल तेलात कापूर मिसळा. याने काही वेळ स्काल्पला मसाज करा. २ ते ३ तास ​​राहू द्या. यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. तुम्ही हे आठवड्यातून दोन दिवस करा. आठवड्याभरात केसांमधील कोंडा दूर होईल आणि केस गळणेही थांबेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT