hair care sakal
लाइफस्टाइल

Hair Colour Care Tips : हेअर कलर केल्यानंतर ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा; केस होणार नाही खराब

हेअर कलर केल्याने काही मिनिटांतच तुमचा लूक बदलतो. ज्यांचे केस पांढरे नाहीत, त्यांनाही वेगवेगळ्या शेड्स देऊन केसांना नवा लुक द्यायचा आहे.

सकाळ डिजिटल टीम

कलरफुल हेअर कलर सध्या बरेच ट्रेंडमध्ये आहेत. हेअर कलर केल्याने काही मिनिटांतच तुमचा लूक बदलतो. ज्यांचे केस पांढरे नाहीत, त्यांनाही वेगवेगळे शेड्स देऊन केसांना नवा लुक द्यायचा आहे. यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. पण त्यात भरपूर केमिकल्स असतात. त्यामुळे अनेक वेळा तुमचे केस खराब होतात. तुमच्यासोबतही असे काही घडले असेल, तर तुम्ही या टिप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

कलर केलेल्या केसांसाठी सल्फेट शॅम्पू वापरू नका

जर तुम्ही हेअर कलर केला असेल तर तुम्ही तुमच्या केसांची योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे, जेणेकरून तुमच्या केसांवर केलेला कलर बराच काळ टिकेल. यासाठी तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गोष्टींचा वापर करणे महत्त्वाचे आहे.

यामुळे तुमचे केसही निरोगी राहतील. शिवाय, तुमचा कलर जास्त काळ टिकेल. यासाठी तुम्हाला सल्फेट शॅम्पू वापरण्याची अजिबात गरज नाही. यामुळे केसांचा कलर पूर्णपणे गायब होईल. तुम्ही फ्री सोडियम सल्फेट शॅम्पू वापरावे. यामुळे केस निरोगी राहतील.

ब्लो ड्रायरचा जास्त वापर करू नका

जर तुम्हाला केस धुतल्यानंतर ब्लो ड्रायरने सुकवायला आवडत असतील तर तुम्ही हे करणे थांबवावे. यामुळे केसांचा कलर पूर्णपणे नाहीसा होतो. तसेच याच्या उष्णतेमुळे केस कोरडे होऊ लागतात. म्हणून, आपले केस नैसर्गिकरित्या कोरडे करण्याचा प्रयत्न करा. यामुळे केसांचे नुकसान कमी होईल. तसेच, केसांचा कलर बराच काळ टिकेल.

डीप कंडिशनिंग मास्क वापरा

जर तुम्हाला तुमच्या केसांचा कलर जास्त काळ टिकून ठेवायचा असेल तर आठवड्यातून दोनदा केसांना डीप कंडिशन करणे महत्त्वाचे आहे. यामुळे केसांचा कलर खराब होत नाही. आणि तुमचे केसही निरोगी दिसतील.

नोरासारखी दिसायला पाहिजे, पत्नीला दररोज ३ तास...; पतीकडून छळ, महिलेची पोलिसात तक्रार

Maharashtra Latest News Update: महत्वाच्या विषयांवर फडणवीसांची भेट घेतली- राज ठाकरे

Reels addiction Impact on Brain: रील्सचा मोह करतोय मेंदूवर दारूसारखा परिणाम? जाणून घ्या धोके आणि तज्ज्ञांनी सांगितलेले उपाय

माेठी बातमी! 'इंडिया आघाडीचे खासदार आक्रमक; दूध दर वाढीसाठी संसद भवनासमोर आंदोलन', भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करा

Pune Rain Update : ताम्हिणी घाटात ५७५ मिमी पावसाची नोंद; पुण्यात रेड अलर्ट

SCROLL FOR NEXT