Happy New Year 2024 esakal
लाइफस्टाइल

Happy New Year 2024 : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी करा या गोष्टी, नवे वर्ष सुख,समाधानाचं जाईल

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही उपाय केल्यास लोकांचे जीवन आनंदी होऊ शकते

Pooja Karande-Kadam

Happy New Year 2024 :

नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघा एक दिवस बाकी आहेत. 1 जानेवारी 2024 रोजी जग नवीन वर्ष साजरे करेल. नवीन वर्ष लोकांच्या जीवनात नवीन आशा आणि नवीन किरण घेऊन येते. नवीन वर्ष त्यांच्यासाठी आनंद घेऊन येईल आणि त्यांच्या समस्या दूर होतील. अशी आशा प्रत्येकाला असते.

ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही उपाय केल्यास लोकांचे जीवन आनंदी होऊ शकते. त्यांच्या आर्थिक समस्या दूर होऊ शकतात. नवी दिल्लीतील ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार डॉ. तारा मल्होत्रा ​​यांच्याकडून नवीन वर्षासाठी काही चमत्कारिक उपायांबद्दल जाणून घेऊया, जे लोकांच्या नशिबाचे दरवाजे उघडू शकतात.

– ज्योतिष शास्त्राच्या मते, वर्ष 2024 चा पहिला दिवस सोमवार आहे. आणि हा दिवस महादेव म्हणजेच भगवान शिव यांना समर्पित आहे. सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान आणि ध्यान करून भगवान शंकराची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली तर लोकांच्या जीवनातील संकटे दूर होतात. या दिवशी गंगाजलात काळे तीळ टाकून भगवान शंकरांना अभिषेक करावा. असे केल्याने तुमचे नशीब बदलू शकते.

- आर्थिक संकटातून मुक्त होण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. असे केल्याने आर्थिक संकटातून सुटका मिळू शकते. याशिवाय नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करण्याचेही विशेष महत्त्व आहे.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करून त्याची पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतील आणि संपत्ती प्राप्त होईल. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही घराच्या अंगणात तुळशीची रोपे लावू शकता. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि घरात सुख-समृद्धी राहते.

वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात तुळशीचे रोप लावले तर वर्षभर पैशाची कमतरता भासणार नाही. रोज संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही गायीला चारा दान करू शकता, तसेच चाऱ्यासाठी पैसेही दान करू शकता.

असे मानले जाते की शनीच्या प्रकोपामुळे, मानवाला आर्थिक नुकसान सहन करावे लागते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काळ्या वस्तूंचे दान करणे शुभ आहे.

दान हे पुण्याचे कर्म असल्याचे सांगितले आहे. दान केल्याने माणसाला जीवनात सुख-शांती मिळते. असे मानले जाते की दान केल्याने साधकावर भगवंताची कृपा सदैव राहते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nasrapur Case : मुलीच्या शरीरावर टणक हत्याराने वार केल्याने जखमा; शवविच्छेदन अहवालात आणखी काय? आरोपीला कुणी केली मदत?

Baramati Politics: अजितदादांच्या अपघाती जाण्याने जनतेचे स्वप्न अधुरे; २०२९ मध्ये सुनेत्रा वहिनींनीच बारामतीतून लढावे : जय पवार

Latest Marathi News Live Update : मुंबईत गोरेगावच्या जंगलात भीषण आग

Bihar Cabinet Expansion : बिहारमध्ये 'निशांत' पर्व सुरू! नितीश कुमारांच्या सुपुत्राकडं आरोग्य विभागाची धुरा; 32 नव्या मंत्र्यांची शपथ, भाजपच्या 9 बड्या नेत्यांना डच्चू

iPhone 17 चक्क 45 हजारपेक्षा कमी किंमतीत मिळतोय; 'इथे' खरेदी केल्यास मिळेल बंपर डिस्काउंट, ऑफर सुरू होताच लागल्या रांगा

SCROLL FOR NEXT