Happy-Teddy-Day 
लाइफस्टाइल

Happy Teddy Day 2021 : भालू आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या 'लव्ह कनेक्शन'ची गोष्ट तुम्हाला माहितीये का?

सुशांत जाधव

Happy Teddy Day 2021, Valentine Week History & Importance :  प्रेमाच्या आठवड्यातील (Valentine Week) चौथा दिवस टेडी डे (Teddy Day) म्हणून साजरा केला जातो. प्रत्येक वर्षातील 10 फेब्रुवारीला साजरा करण्यात येणाऱ्या दिवशी प्रेमाचं प्रतिक हा भालू म्हणजेच बिअर का? असा प्रश्नही अनेकांना पडतो. प्रेमाच्या कनेक्शनमध्ये टेडी बिअर आल्यामागेही एक इतिहास आहे. जाणून घेऊयात यामागची रंजक कहाणी. 

1902 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्ट हे लुसियानाच्या एका दौऱ्यावर होते. यादरम्यान ते सैनिकांसोबत शिकारीला बाहेर पडले. जंगलामध्ये एक भालू झाडाला बांधलेल्या अवस्थेत असल्याचे त्यांना दिसून आले.

वेदनेनं व्याकूळ भालूला गोळ्या घाला असे आदेश त्यांनी आपल्या सैन्याला दिले. एका सैनिकाने यामागचे कारण त्यांना विचारले. भालूला उपचारासाठी शहरात नेईपर्यंत खूप उशीर होईल. कदाचित तडपून तो मध्येच आपला जीव गमावून बसेल. त्यापेक्षा त्याला गोळ्या घालून त्याला वेदनेपासून मुक्ती देणेच योग्य ठरेल, असे उत्तर त्यांनी दिले. आणि मग सैनिकांनी भालूला गोळ्या घातल्या. राष्ट्राध्यक्षांच्या आदेशानं भालूला मारण्यात आलं ही  बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आणि त्यांना टीकेचाही सामना करावा लागला. 

त्यावेळच्या एका व्यंगचित्रकाराने या प्रकरणात एक मोहिम सुरु केली. त्याने एक काळ्या रंगाचा बिअर बनवला. आणि जंगलात गोळ्या घालून मारण्यात आलेल्या भालूला श्रद्धांजली वाहिली. लोकांना ही गोष्ट खूपच भावली. याच ठिकाणी कार्टून शॉप चालवणाऱ्या मॉरिस मिचटॉम हा देखील बीअरच्या कार्टूनने प्रभावित झाला. त्याच्या पत्नीने भालूच्या रंग रुपातील एक कार्टून तयार केले. याचे नाव टेडी ठेवण्यासाठी राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांच्याकडे परवानगी मागण्यात आली. राष्ट्राध्यक्षांच टोपन नाव टेडी होतं. राष्ट्राध्यक्षांनी प्रस्ताव मान्य केला आणि टेडी बीअर अस्तीत्वात आला. सुरुवातीच्या काळात प्रत्येक वर्षाच्या 9 सप्टेंबर रोजी टेडी बीअर डे साजरा केला जायचा.

आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग आता हा दिवस 10 फेब्रुवारीला कसा साजरा करतात? मुली, तरुणी किंवा महिलांना टेडीसंदर्भात एक वेगळेच आकर्षण असते. त्यामुळेच प्रेमाच्या आठवड्यात गर्लफ्रेंण्ड किंवा मैत्रीणीला टेडी भेट देण्याची परंपरा सुरु झाली. त्यामुळे प्रेमाच्या आठवड्यातील चौथ्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

३०० वर्षानंतर मानवी शरीरात आढळला नवा अवयव, कॅन्सर उपचारात होऊ शकतो बदल

Weather Update : कोल्हापुरात ढगफुटीसदृश पाऊस, अनेक भागात ‘कोसळधार’; आणखी 'किती' दिवस पावसाची शक्यता!

BDCC Bank : बीडीसीसी बँकेसमोर काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांत तुफान हाणामारी; सचिवाचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याचा BJP चा आरोप

Latest Marathi News Updates : ऑगस्ट महिन्याच्या देशी, विदेशी दारूच्याविक्रीत घट

India vs Pakistan Asia Cup 2025 : सरकारच्या आदेशानुसार भारत-पाकिस्तान सामना, नियमांचं पालन करणार; अरुण धुमल यांचं स्पष्टीकरण, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT