लाइफस्टाइल

गर्लफ्रेंडला टेडी बेअर देताय? आधी हे वाचा

हा दिवस का साजरा केला जातो त्याचा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे

सकाळ डिजिटल टीम

सध्या व्हेलेंटाईन वीक सुरू आहे. कपल्स रोज वेगवेगळा दिवस साजरा करत आहेत. आज चौथा दिवस असून कपल्स (Couples) टेडी डे साजरा करणार आहेत. व्हेलेंटाईन डे (Valentines Day) दरम्यान कपल्स टेडी बिअर का साजरा करतात असा अनेक कपल्सना प्रश्न पडतो. प्रेम आणि टेडीचा संबंध काय? तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल. त्यामुळेच हा दिवस का साजरा केला जातो ते समजून घेण्यासाठी त्याचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे.

टेडी डे कधी साजरा केला जातो?

वर्षातल्या सगळ्यात रॉमेंटिक दिवसाची सुरूवात ७ फेब्रुवारीपासून होते. त्यानंतर चौथ्या दिवशी टेडी डे साजरा केला जातो. या दिवशी कपल्स आपल्या पार्टनरला टेडी बेअर देत प्रेम व्यक्त करतात.

टेडी बेअरचा इतिहास

14 नोव्हेंबर 1902 साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट मिसिसिपीच्या जंगलात शिकार करायला गेले होते. त्याच्यासोबत असिस्टंट होल्ट कोलीरही होते. तिथे कॉलरनी जखमी काळ्या अस्वलाला पकडून झाडाला बांधले. त्यानंतर साहाय्यकाने अध्यक्षांकडे अस्वलाला गोळी घालण्याची परवानगी मागितली. पण अस्वलाला जखमी अवस्थेत पाहून अध्यक्ष रुझवेल्ट यांना वाईट वाटले. त्यांनी त्याला मारण्यास नकार दिला. 16 नोव्हेंबर रोजी, वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राने व्यंगचित्रकार क्लिफर्ड बेरीमन यांनी तयार केलेल्या घटनेवर आधारित एक छायाचित्र प्रदर्शित केले होते.

टेडी नाव का पडले?

व्यापारी मॉरिस मिचटॉम यांनी वृत्तपत्रातील चित्र पाहून अस्वलाच्या आकारात खेळणी बनवण्याचा विचार केला. त्याने पत्नी रोजसोबत मिळून खेळणे तयार केले. त्याला 'टेडी' नाव देण्यात आले. टेडी या नावामागील आणखी एक गोष्ट म्हणजे राष्ट्राध्यक्ष रुझवेल्ट यांचे टोपणनाव टेडी होते, ती खेळणी राष्ट्रपतींना समर्पित केली गेली होती, म्हणून या जोडप्याने त्यांचे नाव वापरण्याची परवानगी घेतली. त्यानंतर टेडी हे नाव ठेवण्यात आले.

टेडी डे का साजरा केला जातो?

व्हॅलेंटाईन वीकमध्ये टेडी डे साजरा करण्यामागे मुलीच कारणीभूत असतात. बहुतेक मुलींना टेडी बिअर आवडतात. म्हणून मुले मुलींना तो गिफ्ट करतात. म्हणून टेडी डेचा व्हॅलेंटाईन वीकमध्ये समावेश करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : काल सोनं स्वस्त झालं म्हणून खरेदीचा विचार करताय? तर थांबा! आजचा भाव पाहा मग ठरवा...

Malegaon Municipal Election : मालेगावात भाजपची एमआयएमशी छुपी युती; समाजवादी पक्षाच्या नेत्याचा सनसनाटी आरोप, भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले....

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींची संक्रांत होणार गोड! ४ दिवसात जमा होणार ३ हजार... अधिकृत घोषणा!

Santosh Deshmukh Case : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी २३ जानेवारीला

Vashi Crime : ‘तुझाही संतोष देशमुख करू’ म्हणत सरपंचाला मारहाण; पवनचक्कीच्या कामावरून घडली घटना

SCROLL FOR NEXT