Hartalika Vrat 2024  esakal
लाइफस्टाइल

Hartalika 2024 : कधी आहे हरतालिका व्रत? पहिल्यांदाच व्रत करणार असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा!

Hartalika Vrat Niyam : हरतालिकेचे व्रत करताना कुमारीकेने आणि सुहासिनी महिलांनी काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.

सकाळ डिजिटल टीम

Hartalika 2024 :

हिंदू धर्मात अनेक अशी व्रतवैकल्य आहेत जी योग्य जोडीदार मिळावा म्हणून केली जातात. त्यापैकी एक व्रत आहे हरतालिकेचे. हरतालिकेचे व्रत हे कुमारीका आणि विवाहित स्त्रिया करू शकतात. हरतालिकेदिवशी निर्जळी उपवास करून भगवान शंकरांची आराधना केली जाते.

हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. यामागे अशी कथा सांगितली जाते की, पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला 'हरितालिका' असे म्हणतात.

पार्वती मातेने भगवान शंकर पती व्हावेत म्हणून हरतालिकेचे व्रत केले होते. त्यामुळे तिला इच्छित वर प्राप्त झाला. तसेच मुलींनाही अपेक्षित आहे असा नवरा मुलगा मिळण्यासाठी हे व्रत कटाक्षाने पाळले जाते. (Hartalika Vrat)

कधी आहे हरतालिका व्रत?

हरतालिकेचे प्रत यंदा ६ सप्टेंबर रोजी आहे. गणेश चतुर्थीच्या एक दिवस आधी हे व्रत पार पडले जाते. यंदा ७ सप्टेंबर रोजी गणेश आगमन होणार आहे. त्यामुळे यंदा हरतालिकेचे व्रत ६ सप्टेंबर रोजी असणार आहे. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून २१ मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून १ मिनिटापर्यंत असेल.

Hartalika Vrat Niyam : हरतालिकेचे व्रत करताना कुमारीकेने आणि सुहासिनी महिलांनी काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे.

उपवास करताना लहान-मोठे सर्वांचा आदर करा. या दिवशी कुणालाही अपशब्द वापरू नका, ज्यामुळे त्यांचे मन दुखू शकते. तसेच महिलांनी पतीशी भांडण करू नये किंवा अपशब्द वापरू नये. याशिवाय उपवासाच्या दिवशी जाणूनबुजून किंवा नकळत कुटुंबातील कोणाशीही वाईट वागू नका.

व्रतादिवशी दुपारच्या वेळी झोपून राहू नये. उपवास करणारी महिला दिवसा झोपली तर ते शुभ मानले जात नाही.

शास्त्रानुसार जर कोणी हरतालिकेचे व्रत पाळण्यास सुरुवात केली तर त्यांनी मध्येच सोडू नये. हे देखील शुभ मानले जात नाही. दरवर्षी तुम्ही ते संपूर्ण विधीपूर्वक पूर्ण करावे.

शास्त्रानुसार हरतालिकेच्या वेळी व्रत करणाऱ्याने आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका. तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि शांत असावे.

ज्योतिषशास्त्रानुसार हरतालिका व्रतामध्ये चुकूनही पाणी किंवा अन्नाचे सेवन करू नये. कारण हे व्रत निर्जळ करायचे असते. तसेच, या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतींचे नामस्मरण करण्यात वेळ घालवावा.

हरतालिकेच्या व्रतादिवशी उशिरापर्यंत झोपू नये. लवकर उठून नित्यकर्म आटोपून देवाची पूजा करावी. तसेच या दिवशी अंगातील सगळा आळस झिडकारून टाकावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT