Blood Donation
Blood Donation Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Blood Donation: रुग्णासह रक्तदान करणाऱ्यांनाही होतात 'हे' मोलाचे फायदे

सकाळ डिजिटल टीम

Blood Donation Is Good: 'रक्तदान' हे महान दान मानले जाते. कारण जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा तुम्ही फक्त तुमचे रक्तच देत नाही तर एक किंवा अधिक लोकांना जीवनदानही देता. जेव्हा एखाद्या व्यक्तीला रक्त दिले जाते, तेव्हा आपण ज्या व्यक्तीला रक्तदान करत आहात, त्या व्यक्तीचाच जीव वाचतो. परंतु जेव्हा तुम्ही नियमितपणे रक्तदान करता तेव्हा रक्ताव्यतिरिक्त आरबीसी आणि प्लाझ्मा देखील वेगवेगळ्या लोकांना दान करता येतात.

रक्तदानाबाबत (Blood Donation) आपल्या देशात अनेक प्रकारच्या जनजागृती मोहिम सुरू आहेत, परंतु तरीही रुग्णांना आवश्यकतेनुसार रक्त मिळू शकत नाही. याचे कारण फक्त गैरसमज आहेत, जे रक्तदानाबाबत लोकांमध्ये पसरवले जातात. यासोबतच रक्तदान केल्यावर आपल्या शरीराला कोणते फायदे मिळतात याविषयी माहितीचा अभाव आहे. रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला कोणते फायदे होतात हे जाणून घेउया.

  • रक्तदान केल्याचा शरीरावर कसा परिणाम होतो?

जेव्हा एखादी व्यक्ती रक्तदान करते तेव्हा त्याच्या शरीरात रक्ताची कमतरता नसते. कारण रक्तदान करण्यापूर्वी डॉक्टर रक्तदात्याचा हिमोग्लोबिन, रक्त युनिट आणि रक्तदाब या सर्व गोष्टी तपासतात आणि जेव्हा तुम्ही रक्तदान करता तेव्हा शरीराला हे फायदे मिळतात.

  • लोहाची पातळी मेंटेम राहते

रक्तात लोहाची कमतरता असेल तर शरीराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण लोहाचे प्रमाण वाढले तरी अनेक आजार माणसाला घेरतात. यातील पहिली समस्या म्हणजे ऊतींचे नुकसान, यकृताचे नुकसान आणि शरीराचे ऑक्सिडेटिव्ह आयुष्य वाढणे. म्हणजेच, त्याचे बहुतेक परिणाम असे असतात, ज्याबद्दल आपल्याला उशिरा कळते, जेव्हा परिस्थिती बिघडते. परंतु जे नियमित रक्तदान करतात त्यांच्या शरीरातील लोहाची पातळी कायम राहते.

  • हृदयविकारापासून बचाव

रक्तातील लोह वाढणे देखील हृदयविकाराचे कारण असू शकते. कारण लोहामुळे ऊतींचे वाढलेले ऑक्सिडेशन रक्तप्रवाहात अडथळा आणते. त्यामुळे तुम्ही स्वतः निरोगी (Healthy) असाल तर तुमचे हृदय आयुष्यभर (Life) निरोगी ठेवण्यासाठी रक्तदान करायचा विचार करायला हवा.

  • भावनिक आरोग्यासाठी फायदेशिर

प्रत्येक निरोगी व्यक्ती दर तीन महिन्यांनी रक्तदान करू शकते. एका वेळी रक्तदान करून तुम्ही 3 ते 4 लोकांचे जीव वाचवू शकता. ही भावना तुम्हाला आनंदी ठेवण्यास मदत करते. एखाद्याचा जीव वाचवल्याचा आनंद तुम्हाला आत्म-समाधानाने भरतो, जे तुमच्या भावनिक आरोग्यासाठी खूप चांगले आहे.

  • रक्तदान करताना या गोष्टी ठेवा लक्षात

रक्तदात्याचे वय 18 ते 65 वर्षांच्या दरम्यान असावे.

दात्याचे वजन 45 किलोपेक्षा जास्त असावे.

प्रत्येक वेळी रक्तदान करताना किमान ३ महिन्यांचे अंतर असावे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT