Benefits Of Pear esakal
लाइफस्टाइल

Benefits Of Pear : निरोगी हृदयासाठी अन् आजारांना दूर ठेवण्यासाठी पावसाळ्यात रोज खा नाशपाती, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Health Benefits of Eating Pear : पावसाळ्यात 'व्हिटॅमिन सी' ने समृद्ध असलेली फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो.

Monika Lonkar –Kumbhar

Benefits Of Pear : सध्या देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असून, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण, या दिवसांमध्ये अनेक संसर्गजन्य आजार उद्भवतात. त्यासाठी संतुलित आहार घेणे फायद्याचे ठरते. आपल्याकडे प्रत्येक ऋतुमध्ये विविध प्रकारची फळे मिळतात. पावसाळ्यात खास करून व्हिटॅमिन सी समृद्ध असलेली फळे आणि भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो.

कारण, व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेली फळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. शिवाय, पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून संरक्षण ही करतात. नाशपाती (Pear) हे असेच एक फळ आहे, जे पावसाळ्यात खाल्ल्यास अनेक फायदे होतात.

मधुमेह आणि हृदयविकाराच्या रूग्णांसाठी हे फळ अतिशय फायदेशीर मानले जाते. पावसाळ्यात हे फळ खाल्ल्याने अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. आज आपण नाशपाती खाण्याचे आरोग्यदायी फायदे कोणते आहेत? ते जाणून घेऊयात.

पचनक्षमता सुधारते

नाशपातीमध्ये फायबरचे मुबलक प्रमाण आढळून येते. या फायबर्समुळे आपल्या शरीराची पचनक्षमता सुधारण्यास मदत होते. त्यामुळे, नाशपातीचे अवश्य सेवन करा. हे फळ रोज खाल्ल्याने पचनक्रिया सुधारतेच, शिवाय आतड्यांची हालचाल देखील सुधारते. नाशपातीमुळे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते

नाशपातीमध्ये व्हिटॅमिन सी सोबतच इतर अनेक अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे, या फळाचे सेवन केल्याने आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. नाशपातीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळून येतात. हे गुणधर्म हृदयरोग आणि मधुमेहाला दूर ठेवण्यास मदत करतात.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

नाशपातीमध्ये Procyanidin antioxidant चे विपुल प्रमाण आढळते. त्यामुळे, हृदयाच्या स्नायूंचा कडकपणा कमी करण्यास मदत होते. या व्यतिरिक्त नाशपाती रक्तदाब रोखण्यासाठी आणि कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी ठेवण्यास देखील मदत करतात. त्यामुळे, ज्या लोकांना हृदयाच्या समस्या आहेत. त्या लोकांनी या फळाचा आहारात अवश्य समावेश करावा.

मधुमेहाचा धोका कमी करते

नाशपाती या फळाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा कमी असतो. त्यामुळे, या फळाचे सेवन केल्याने आपल्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. कारण, नाशपाती अँथोसायनिनने समृद्ध आहे. हे एक अँटिऑक्सिडेंट असून ज्यामध्ये मधुमेह-विरोधी आणि दाहक-विरोधी प्रभाव दिसून येतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT