लाइफस्टाइल

Laughing Health Benefits: मनमोकळेपणाने हसणे तुम्हाला या आजारांपासून दूर ठेवू शकते! जाणून घ्या

हसल्याने तुमच्या आरोग्याला होतील हे फायदे, जाणून घ्या

Aishwarya Musale

मनमोकळेपणाने हसण्याने घरातील वातावरण तर सुधारतेच पण ते शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हसणे हे सर्वोत्तम औषध मानले जाते. जीवनात तुम्ही जितके जास्त हसाल तितके तुमचे हृदय अधिक तंदुरुस्त आणि निरोगी असेल.

असाच एक अभ्यास समोर आला आहे. ज्यामध्ये मोकळेपणाने हसणे हे औषधापेक्षा कमी नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आरोग्याच्या मोठ्या समस्या क्षणार्धात दूर होतात.

हसण्याने हृदयविकाराचा धोका बर्‍याच प्रमाणात कमी होतो आणि हृदय निरोगी राहते. मोकळेपणाने हसल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणाली सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयाचे कार्य चांगले होते.

रक्तदाब कमी करण्यास मदत

नियमितपणे जे लोक खूप हसतात, त्यांचे उच्च रक्तदाब नियंत्रणात राहते. रक्तवाहिन्यांचे कार्य हसण्यामुळे सुधारते आणि शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. ज्याद्वारे हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाशी संबंधित आजार टाळता येतात.

मूडमध्ये बदल

शरीरात हसण्याच्या प्रक्रियेदरम्यान एंडोर्फिन नावाचे हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे संपूर्ण शरीर आनंददायी भावना आणि सकारात्मकतेने भरते. हा हार्मोन मूड फ्रेश करण्यास मदत करतो.

नैराश्यापासून मुक्ती

शरीर हसण्यामुळे अधिक मेलाटोनिन तयार करते, जे मेंदूद्वारे सोडले जाणारे हार्मोन आहे. माणसाला यामुळे चांगली झोप लागते आणि झोपेची पद्धतही सुधारते. एवढेच नाही तर नैराश्याने ग्रासलेल्या लोकांसाठी हा रामबाण उपाय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT