लाइफस्टाइल

Black Carrot Benefits : हिवाळ्यात नक्की खा काळे गाजर; वेट लॉससोबत या गंभीर आजाराचा धोका करतात कमी

हिवाळ्यात काळ्या रंगाचे गाजर खाणे खूप फायद्याचे असते.

Aishwarya Musale

थंडीच्या दिवसात स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्या आहारात गाजराचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. अनेकजण गाजर सलाडच्या स्वरूपातही खातात, तर अनेकांना गाजराचे वेगवेगळे पदार्थ आवडतात. गाजरमध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीराला सुरळीतपणे कार्य करण्यास मदत करतात.

जेव्हा आपण गाजराबद्दल बोलतो तेव्हा आपल्या मनात फक्त लाल गाजरच येतात. पण तुम्हाला माहीत आहे का की गाजरांचा रंग काळाही असतो? पौष्टिकतेने समृद्ध काळ्या गाजरमध्ये अँथोसायनिन्स भरपूर प्रमाणात असतात, जे त्याला गडद जांभळा रंग देतात; जो जवळजवळ काळा दिसतो.

काळे गाजर

लाल गाजरपेक्षा काळे गाजर अनेक पटींनी जास्त फायदेशीर मानले जाते. फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, मॅंगनीज, व्हिटॅमिन बी यासह अनेक आवश्यक पोषक घटक त्यात आढळतात. आज आम्ही तुम्हाला काळे गाजर खाण्याचे फायदे सांगणार आहोत.

वेट कंट्रोल

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी काळ्या गाजराचे सेवन खूप चांगले मानले जाते. त्यात पुरेशा प्रमाणात फायबर असते. यामुळे जास्त भूक नाही लागत. जर तुम्हालाही तुमच्या वजनाची काळजी वाटत असेल, तर तुमच्या आहारात काळ्या गाजरांचा अवश्य समावेश करा.

पोटाच्या समस्या

काळ्या गाजरामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते जे योग्य पचन राखण्यास मदत करते. काळ्या गाजराचे सेवन बद्धकोष्ठता, अपचन आणि पोटदुखीच्या समस्यांपासून दूर राहण्यास खूप उपयुक्त आहे.

कोलेस्टेरॉल कमी होते

काळ्या गाजरमध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. याच्या सेवनाने चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL franchise sale Latest News : कुणी संघ विकत घेत का?, 'RCB' नंतर 'आयपीएल'मधील आणखी एक संघ विक्रिला!

Maharashtra Politics: पैशांच्या वाटपावरून वाद! बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

Ajit Pawar : “बारामतीप्रमाणे मंचरचा चेहरामोहरा बदलू”- अजित पवारांची घोषणा!

Viral Video: 'अरे भाई, तो माझा मित्र आहे...', रांचीमध्ये पोहचताच रोहित शर्माची सुरक्षारक्षकासोबत 'बिहारी स्टाईल' मस्करी

बापरे! अभिनेता शशांक केतकर बेपत्ता, सिद्धार्थ जाधव घेऊन फिरतोय मिसिंगचे पोस्टर, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT