Neem  sakal
लाइफस्टाइल

Neem Benefits: सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने चघळण्याचे हे आहेत शरीराला फायदे

कडुलिंबाची चव कडू असली तरी कडुलिंबात अनेक औषधी गुणधर्म असतात, जे आरोग्यासाठी चांगले असतात.

Aishwarya Musale

आयुर्वेदिक दृष्टिकोनातून कडुलिंब अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याची चव कडू असली तरी, कडुलिंबात अनेक औषधी गुणधर्म असतात, जे आपल्या आरोग्यासाठी चांगले असतात.

आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाचे सेवन केल्यास शरीरातील अर्धे आजार बरे होतात. रिकाम्या पोटी कडुलिंब खाण्याचे काय फायदे आहेत हे आज आपण जाणून घेऊया.

रिकाम्या पोटी कडुलिंब खाण्याचे फायदे

1. ब्लड शुगर कंट्रोल

भारतात खराब जीवनशैलीमुळे मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. लोक अजूनही घरगुती उपचारांवर विश्वास ठेवतात. घरगुती उपाय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाणे. रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास असे केल्याने मदत होते.

2. रक्त शुद्ध करते

महत्वाची गोष्ट म्हणजे कडुलिंबात असे औषधी गुणधर्म आहेत की ते शरीरातील रक्त शुद्ध करते. हे रक्तातील टॉक्सिन बाहेर काढून रक्त डिटॉक्सिफाय करते. जर तुमचे रक्त स्वच्छ असेल तर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही.

3. पोटासाठी फायदेशीर

कडुलिंब केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर पोटासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये असलेले गुणधर्म अॅसिडिटीमध्ये खूप उपयुक्त आहेत आणि कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने ऍसिडिटी आणि पोटदुखीपासून आराम मिळतो.

4. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर

अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट कडुनिंबाच्या पानांमध्ये असतात, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. एवढंच नाही तर सर्दी, खोकला यांसारखे आजार बरे करण्यासाठी याचा उपयोग होतो.

कडुलिंबाच्या पानांचे असे करा सेवन

कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून त्यातून काढलेला रस साधारणपणे सेवन केला जातो. कडुलिंबाच्या ताज्या पानांचा रस नेहमी सेवन करा.

तुम्ही कडुनिंबाची पानं तव्यावर कोरडी भाजून, हाताने मॅश करून, त्यात लसूण आणि मोहरीचं तेल घालून भातासोबत खाऊ शकता.

कडुलिंबाच्या पानांचे सेवन करताना ही काळजी घ्या

एकावेळी खूप कडुलिंबाची पाने खाऊ नका. अनेकांना असे वाटते की कडुलिंबाची पाने जितकी जास्त खावीत तितके चांगले पोषण मिळेल. मात्र, याचे नेहमी कमी प्रमाणात सेवन करा. तुम्हाला कोणताही आजार असल्यास, कृपया ते सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांशी बोला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT