Fitness  sakal
लाइफस्टाइल

Fitness Tips : कपालभाती करताना 'या' चुका टाळा; तज्ज्ञांकडून जाणून घ्या योग्य पद्धत

कपालभाती प्राणायाम आरोग्यासाठी फार उपयुक्त आहे, पण योग्य प्रकारे केला जाणे आवश्यक आहे.

Aishwarya Musale

निरोगी शरीर आणि शांत मन, ही प्रत्येक माणसाची इच्छा असते. तुमचे मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग हा एक उत्तम पर्याय आहे. योगाच्या आसनांमध्ये निरोगी जीवनाचे रहस्य दडलेले आहे. 

फीटनेस हवा असेल तर व्यायाम, योगासनांबरोबर प्राणायाम करणं देखील तेवढंच आवश्यक असतं. यामुळे तुमच्या मानसिक, शारीरिक स्वास्थ्याबरोबरच सौंदर्यातही भर पडते. त्यामुळे श्वासावरील नियंत्रणाद्वारे केला जाणारा प्राणायाम वरवर पाहता जरी सोपा वाटत असला तरी, ते करण्याचे काही नियम व योग्य पद्धती आहेत. ज्याचं पालन होणं आवश्यक असतं. नाहीतर त्याचे दुष्परीणामही भोगावे लागू शकतात.

पण योग्य पद्धत माहीत नसल्याने बरेच लोक चुकीच्या पद्धतीनेच सराव करतात. कपालभाती रक्त प्रवाह वाढवते, ज्यामुळे हृदयाशी संबंधीत समस्या दूर ठेवण्यास मदत होते. अशावेळी काही खबरदारी घेणे गरजेचे असते.

कपालभाती प्राणायाम करण्याची योग्य पद्धत

  • डोळे बंद करून श्वासावर लक्ष ठेवा. नंतर ओमचा उच्चार करत लयात श्वास घ्यावा आणि सोडावा.

  • दीर्घ श्वास घेऊन जोरात श्वास सोडावा. ही क्रिया करताना पोट आत आणि बाहेर होते की नाही याकडे नीट लक्ष द्या.

  • कोणताही प्राणायाम करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी की, श्वास घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया सहज झाली पाहिजे.

  • क्षमतेनुसारच श्वास घ्यावा अन् सोडावा. कोणताही ताण न देता.

  • यामुळे तुमचे पोट मजबूत होण्यास, पचनाशी समस्या सुधारून चयापचय वाढण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

Nepal Flood Alert : नेपाळच्या महापुरात नाशिकचे पर्यटक अडकले? जिल्हा प्रशासनाकडून तातडीने हेल्पलाइन क्रमांक जारी, पाहा लिंक आणि कंट्रोल रूम नंबर

‘I Love My बायको! रितेश असं बोलला तरी जेनिलिया रुसली, दोघांचा व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Marathi News Live Updates : कोल्हापुरातील रस्त्यांची चाळण, ठाकरे गटाकडून खड्ड्यांमध्ये झाडं लावणार

MPSC Paper Leak : पेपरफुटीला लव्ह स्टोरी नाही, सत्ताधारी जबाबदार; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT