hair fall sakal
लाइफस्टाइल

Hair Fall In Menopause: मेनोपॉजमुळे केस गळू लागले आहेत? मग हे उपाय करून पाहा

मेनोपॉजच्या काळात महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

Aishwarya Musale

महिलांमध्ये वयाच्या ४० वर्षांनंतर मेनोपॉज सुरू होते. मेनोपॉजच्या काळात महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या काळात शरीरात अनेक प्रकारचे हार्मोनल बदल होतात.

शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनचे प्रमाण कमी होते. मेनोपॉजमुळे केवळ मूड बदलणे, निद्रानाश होतो असे नाही तर त्वचेच्या समस्या आणि केस गळणे देखील होते. मेनोपॉजच्या काळात केस गळण्याची समस्या वाढते. या काळात आंघोळीनंतर केसांना कंघी केल्याने केस जास्त तुटतात.

मेनोपॉजच्या काळात केस गळण्याची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता. चला जाणून घेऊया केस गळती टाळण्याचे उपाय.

केस गळणे कमी करण्यासाठी व्यायाम करा

मेनोपॉज दरम्यान हार्मोनल बदलांमुळे तणाव होतो. शरीरातील इस्ट्रोजेनचे उत्पादन कमी झाल्यामुळे त्याचा मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे मूड स्विंग, चिंता यासारख्या समस्या उद्भवू लागतात. चिंतेमुळे केस गळायला लागतात.

मेनोपॉजच्या काळात केस गळण्याची समस्या कमी करण्यासाठी दररोज व्यायाम किंवा योगासने करावीत. मॉर्निंग वॉक करावा. सुरुवातीला अर्धा तास रनींग करा. व्यायामामुळे तणाव तर कमी होतोच शिवाय शरीर निरोगी राहते.

सेतू बंध सर्वांगासन, जानुशीर्षासन आणि बद्धकोनासन करावे. या सर्व सोप्या पद्धती मेनोपॉजच्या काळात तुम्हाला निरोगी ठेवतील.

केस गळण्याची समस्या कमी करण्यासाठी आहार

खाण्यापिण्याच्या योग्य सवयींमुळे शरीराशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते, असे म्हणता येईल. त्याचप्रमाणे मेनोपॉजच्या काळात तुमचे केस जास्त गळत असतील तर तुम्ही तुमच्या आहारात बदल करावा. तुमच्या आहारात व्होल ग्रेन, फळे आणि भाज्यांचा समावेश करा.

कमी चरबीयुक्त आहार घ्या. तुम्ही संतुलित आहार घ्यावा. तुमच्या आहारात कोणत्याही आवश्यक पोषक घटकांचे प्रमाण कमी किंवा जास्त नसावे. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू लागतात.

ग्रीन टी प्यायल्याने केसांच्या वाढीवरही परिणाम होतो. तसेच तुमच्या आहारात फॅटी ऍसिडचा समावेश करा, कारण ते केसांचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोन्यात वाढ सुरुच, चांदीही चमकली; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

NVS Recruitment 2025: नोकरीची सुवर्णसंधी! शिक्षक व शिक्षकेतर पदांसाठी मेगा भरती सुरू; अर्जाची शेवटची तारीख आत्ताच जाणून घ्या!

बापरे! सूरजच्या लग्नानंतर जान्हवी किल्लेकर थेट रुग्णालयात? फोटो शेअर करत म्हणाली...

Kolhapur Construction Worker : कागलमध्ये ३० हजारांवर बांधकाम कामगार! फुगलेली नोंदणी उघड प्रतिनिधींचा पारदर्शकतेसाठी आवाज बुलंद

Satara Politics: देगाव एमआयडीसी आमदार शशिकांत शिंदेंमुळेच गेली : मंत्री शिवेंद्रराजेंचा घणाघात; नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT