लाइफस्टाइल

Pregnancy Tips : गरोदरपणात कॉफी पिणे सुरक्षित असते का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

गरोदरपणात कॉफी पिणे सुरक्षित असते का?

Aishwarya Musale

गर्भधारणा हा स्त्रीसाठी एक सुंदर प्रवास आहे, परंतु त्या दरम्यान अनेक अडचणी येतात. महिलांना अनेक समस्यांमधून जावे लागते. खूप काळजी घ्यावी लागते, विशेषतः खाण्यापिण्याबाबत काळजी घ्यावी लागते. जीवनशैलीतील थोडासा निष्काळजीपणा देखील आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. काही महिलांना कॉफी पिण्याची सवय असते जी त्या गरोदरपणातही सुरू ठेवतात, पण प्रश्न असा आहे की गरोदरपणात कॉफी प्यावी का?

गर्भधारणेदरम्यान कॉफी पिणे सुरक्षित आहे का?

तज्ज्ञांच्या मते, कॉफीमध्ये कॅफिन असते, जे उत्तेजक असते. यामुळे मज्जासंस्थेला चालना मिळते पण त्यामुळे गर्भधारणेदरम्यान गर्भपातही होऊ शकतो. गर्भवती महिलांनी कॉफीचे सेवन जास्त केले तर मुलांच्या वाढीस अडथळा निर्माण होतो. तज्ज्ञांच्या मते, कॅफिन प्लेसेंटा ओलांडून मुलापर्यंत पोहोचू शकते, ज्यामुळे मुलाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. कॅफीन मुलाच्या मेंदूमध्ये प्रवेश करू शकते, ज्यामुळे मानसिक विकास देखील बाधित होऊ शकतो. यामुळे लो बर्थ रेट होऊ शकतो. त्याचबरोबर आईला निद्रानाश, रक्तदाब वाढणे, हार्ट हेल्थ रेट यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

तज्ज्ञांच्या मते, गरोदर महिलांनी एका दिवसात एक कप कॉफी म्हणजेच 200 मिलीग्राम कॅफिनपेक्षा जास्त सेवन करू नये. तज्ज्ञांच्या मते काही लोक ब्लॅक आणि व्हाईट अशा दोन प्रकारची कॉफी पितात, त्यामुळे जर तुम्हाला ब्लॅक कॉफी पिण्याची आवड असेल, तर या काळात दुधाचे प्रमाण वाढवूनच कॉफीचे सेवन करा. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता कमी होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जर तुम्ही एनर्जीसाठी कॉफी पित असाल तर पाण्यात लिंबाचा तुकडा टाकून किंवा त्याऐवजी फ्रेश ज्यूस किंवा हर्बल चहाचे सेवन केल्यास फायदा होऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT