Health
Health  sakal
लाइफस्टाइल

World Kidney Day 2024: तुमची किडनी खराब होत आहे हे कसं ओळखाल? शरीरातील 'या' बदलांकडे द्या लक्ष...

Aishwarya Musale

किडनी हा आपल्या शरीराचा सर्वात महत्वाचा भाग आहे. हे केवळ ॲसिडच काढून टाकत नाही तर शरीराला निरोगी बनवणाऱ्या खनिजांचे संतुलन देखील राखते. पण आजच्या युगात बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे किडनी निकामी होणे अगदी सामान्य झाले आहे. असंतुलित खाणे, आरोग्यावर विपरित परिणाम करणारे पदार्थ आणि इतर वाईट सवयींमुळे किडनीलाही नुकसान होऊ शकते. किडनी फेल्युअरची लक्षणे इतकी सौम्य असतात की हा आजार वाढत नाही तोपर्यंत बहुतेक लोकांना काही फरक जाणवत नाही.

1. त्वचेला खाज सुटणे

किडनीच्या समस्या आपल्या शरीराच्या अनेक अवयवांवर थेट परिणाम करतात. यामध्ये त्वचेचाही समावेश होतो. त्वचेमध्ये कोरडेपणा आणि खाज येणे हे देखील किडनी विकाराचे मुख्य लक्षण आहे.

2.थकवा

सतत अशक्त आणि थकल्यासारखे वाटणे ही मूत्रपिंडाच्या समस्येची सुरुवातीची लक्षणे आहेत. किडनीचा आजार गंभीर झाल्यामुळे, व्यक्तीला पूर्वीपेक्षा अधिक अशक्त आणि थकल्यासारखे वाटते. चालतानाही थोडा त्रास जाणवतो. हे मूत्रपिंडात विषारी पदार्थ जमा झाल्यामुळे होते.

3. सतत लघवी येणं

एक सामान्य निरोगी व्यक्ती दिवसातून 6-10 वेळा लघवी करते. वारंवार लघवी होणे हे मूत्रपिंड निकामी होण्याचे लक्षण आहे. मूत्रपिंडाच्या समस्येच्या बाबतीत, व्यक्तीला खूप वेळा लघवी करण्याची तीव्र इच्छा जाणवते. ही स्थिती किडनीला नुकसान पोहोचवते. काही लोकांच्या लघवीतूनही रक्त बाहेर येते.

4. शरीरात सूज येणे

किडनीवर होणारे दुष्परिणाम आपल्या शरीराच्या इतर भागांवर दिसू लागतात. यामध्ये पोटऱ्या आणि घोट्याला सूज येते. ही गंभीर मूत्रपिंडाच्या आजाराची लक्षणे असू शकतात. साधारणपणे, जेव्हा किडनी नीट काम करत नाही तेव्हा अशी लक्षणे दिसतात, जर तुमच्यासोबत असे होत असेल तर ताबडतोब तपासणी करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

IPL 2024: 'मला फक्त शेवटची संधी द्या...', RCB कडून खेळणाऱ्या स्वप्नील सिंगला व्यक्त होताना अश्रु अनावर

Pune Rain Updates : पुण्यात वादळी वाऱ्यासह पाऊस! कुठे झाडं कोसळली, कुठे पत्रे उडाले तर अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी

SCROLL FOR NEXT