bone  sakal
लाइफस्टाइल

Benefits Of vitamin D: फक्त कॅल्शियमच नाही तर मजबूत हाडांसाठी हे व्हिटॅमिन्सही आहेत खूप महत्त्वाची, जाणून घ्या

हाडांच्या मजबुतीसाठी ही जीवनसत्त्वे असतात आवश्यक

Aishwarya Musale

हाडांच्या मजबुतीसाठी कॅल्शियमचे सेवन पुरेसे असते असा अनेकदा लोकांचा गैरसमज असतो, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.असे मानले जाते. एवढेच नाही तर आपल्या शरीराला त्याचे इतरही अनेक फायदे मिळतात.

मेडिकल न्यूज टुडेच्या मते, मानवी शरीराला सूर्याच्या किरणांपासून व्हिटॅमिन डीचा पुरवठा होतो, तर काही खाद्यपदार्थ आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करू शकता. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की हाडांसह शरीरासाठी व्हिटॅमिन डी किती महत्त्वाचे आहे.

व्हिटॅमिन डी हाडांसाठी खूप महत्त्वाचे आहे

अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियमसोबतच व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करणे खूप आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे कॅल्शियम शरीरात शोषले जात नाही आणि वयाच्या आधी हाडे कमकुवत होऊ लागतात.

मुलांना ही समस्या असू शकते

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांमध्ये मुडदूस होऊ शकतो, ज्यामुळे हाडे मऊ होऊ लागतात आणि पायात गुठळ्या सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे, प्रौढांमध्ये, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे ऑस्टियोमॅलेशिया किंवा हाडे मऊ होऊ शकतात.

ऑस्टियोमॅलेशियामुळे हाडांची घनता कमी होते आणि स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता खूप जास्त असते.

रोग प्रतिकारशक्तीसाठी रामबाण उपाय

व्हिटॅमिन डीचे पुरेसे सेवन केल्याने तुमची रोग प्रतिकारशक्ती चांगली राहते. संशोधकांना असे आढळून आले आहे की व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारक कार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि दीर्घकालीन व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मधुमेह, दमा आणि स्वयंप्रतिकार विकार होऊ शकतात.

व्हिटॅमिन डीचे स्त्रोत

सूर्यकिरण हे व्हिटॅमिन डीचे सर्वात मोठे स्त्रोत आहेत. पण व्हिटॅमिन डीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी त्याचा आहारात समावेश करणे देखील आवश्यक आहे. यासाठी सॅल्मन, मॅकरेल आणि ट्यूना, अंडी, चीज, बीफ लिव्हर, चीज, मशरूम, पाश्चराइज्ड दूध आहारात समावेश करा.

याशिवाय, तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी सप्लीमेंट घ्या, जे शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करण्यासाठी खूप वेगाने काम करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दिग्गज अभिनेत्याचा शेवटचा सिनेमा ठरला फ्लॉप, आता OTT वर ट्रेंडिंगमध्ये, चित्रपट पाहून डोळ्यात येईल पाणी

Nano Banana 2 झाले लाँच! फ्रीमध्ये तुमच्या फोटोला द्या नवा ट्रेंडी लुक, गुगल जेमिनीवर कॉपी-पेस्ट करा 'हे' 5 बेस्ट प्रॉम्प्ट

Latest Marathi News Live Update : अजित पवार यांच्या अपघाताप्रकणी आज DGCA चा रिपोर्ट येण्याची शक्यता

झिम्बाब्वेचा विराट कोहली! भारताविरुद्ध ९७ धावांची खेळी करणारा ब्रायन बेनेट नेमका कोण?

Block Layoffs : AI ने हिरावला तोंडचा घास ! दिग्गज अमेरिकन कंपनीने ४००० हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

SCROLL FOR NEXT