health sakal
लाइफस्टाइल

Women Health : निरोगी अन् तंदुरुस्त राहण्यासाठी विशीमध्ये घ्या 'असा' आहार; तरुणींसाठी खास टिप्स

20 ते 25 वर्षांच्या तरुणींनी आहारात करावा या गोष्टींचा समावेश; राहाल निरोगी आणि तंदुरूस्त

Aishwarya Musale

प्रत्येकाला माहित आहे की शरीराला निरोगी ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या पोषक तत्वांची आवश्यकता असते. परंतु आजच्या व्यस्त जीवनशैलीत लोकांना त्यांच्या आहारात सर्व प्रकारच्या पोषक तत्वांचा समावेश करणे खूप कठीण होऊन बसते. विशेषतः महिलांनी त्यांच्या आहारात पोषक तत्वांचा समावेश करावा.

20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलींनी त्यांच्या आहारात कोणत्या पोषक घटकांचा समावेश केला आहे याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. या वयात आहारात पोषक तत्वांचा समावेश केल्यास भविष्यात फायदा होतो. चला तर मग जाणून घेऊया त्या अत्यावश्यक पोषक तत्वांबद्दल ज्यांचा तुम्ही आहारात समावेश केला पाहिजे.

फोलेट- हृदयाचे आरोग्य, स्नायूंचे आरोग्य, ऊर्जा, पचन, ब्लड हेल्थ, भूक कंट्रोल करणे, डोळे आणि त्वचेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. यामुळे गर्भधारणेदरम्यान बर्थ डिफेक्टचा धोकाही कमी होतो.

सोर्स - ब्रोकोली, चणे, हिरव्या पालेभाज्या

लोह- हार्मोनल संतुलनासोबतच शरीराच्या विविध कार्यांसाठी लोह खूप महत्त्वाचे मानले जाते.

सोर्स- मनुका, कडधान्ये, सोयाबीन, तीळ.

कॅल्शियम- हाडांचे आरोग्य, दात, स्नायूंचे कार्य, हार्मोनल संतुलन यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.

सोर्स- नाचणी, पनीर, चाकवतची पाने, तीळ

व्हिटॅमिन डी- व्हिटॅमिन डी हे मानवी शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्व आहे. त्याचा सर्वोत्तम सोर्स सूर्यप्रकाश आहे. व्हिटॅमिन डी देखील रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. त्यामुळे मधुमेहासारख्या आजारांपासूनही सुटका मिळू शकते.

व्हिटॅमिन ई- हे अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते आणि रोगप्रतिकार शक्ती, हार्मोनल संतुलन, जळजळ कमी करण्यास मदत करते.

सोर्स- बाजरी, आंबा, नारळ, अक्रोड.

मॅग्नेशियम- मॅग्नेशियम हे एक खनिज आहे जे शरीरासाठी खूप महत्वाचे आहे, म्हणून त्याला 'मास्टर खनिज' म्हणतात. हृदयाचे कार्य योग्यरित्या होण्यासाठी मॅग्नेशियम आवश्यक आहे.

सोर्स- केळी, अ‍ॅवोकॅडो, नट्स, हिरव्या पालेभाज्या, अंजीर, ज्वारी.

ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स- ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स हे आपल्या शरीराला खूप आवश्यक असलेल्या पोषक घटकांपैकी एक आहे. हे आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचा आणि मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. शरीरात ओमेगा-३ फॅटी ॲसिडच्या कमतरतेमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

सोर्स- तूप, अ‍ॅवोकॅडो, ऑलिव्ह ऑईल, अक्रोड, चिया सीड्स.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

मोठी बातमी! भाजपकडून ३ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, राजकारणात खळबळ

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

Rajapur Tragedy : नाणारमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेली एकाच घरातील ४ भावंडे बुडाली; तिघांचे मृतदेह हाती

SCROLL FOR NEXT