लाइफस्टाइल

Health Care Tips : पायऱ्या चढताना लगेच धाप लागते? या गंभीर आजारांचा धोका असू शकतो

पायऱ्या चढताना थकवा येतोय? असू शकतो या गंभीर आजारांचा धोका

Aishwarya Musale

आजकाल लोकांच्या खाण्याच्या सवयी आणि अनियमित जीवनशैलीमुळे स्टॅमिना कमी होत चालला आहे. त्यामुळे थोडे अंतर चालले तरी थकवा जाणवू लागतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपल्या घराच्या किंवा ऑफिसच्या ठिकाणी पायर्‍या चढतो तेव्हा आपल्याला दम लागतो आणि आपल्या हृदयाचे ठोके देखील खूप वेगवान होतात.

पायऱ्या चढतानाही थकवा जाणवत असेल तर तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बऱ्याच लोकांना पायी चालणे, पायऱ्या चढणे यांसारख्या साध्या सोप्या हालचाली करूनसुद्धा थकवा जाणवतो. ही लक्षणे एखाद्या गंभीर आजाराचीही असू शकतात. तेव्हा याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

श्वास फुलून येणे किंवा फार दम लागणे ही लक्षणं दिसल्यास तुमच्या फुफ्फुसांच्या आरोग्यात बिघाड झाल्याचे कळते. तुम्ही वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधल्यास यावर निदान शक्य आहे.

हेल्थडायरेक्टच्या मते, फुफ्फुसांचा आजार, हृदयाचा आजार, इन्फेक्शन, पॅनिक अटॅक आणि फुफ्फुसांच्या नसांत ब्लॉकेड असल्यास तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो. खोकला, घाबरल्यासारखे वाटणे, छाती दुखणे, शिंका येणे, गळ्यात दुखणे यांसारखीही लक्षणं तुम्हाला दिसून येतील. ही लक्षणं हलक्यात घेऊ नका, वेळीच डॉक्टरांना दाखवा.

वातावरणात बदल झाल्यास व्हा सावध

हवामान बदलले की श्वसनाचे आजार गंभीर होतात. यावेळी विषाणू आणि बॅक्टेरियाचा धोका वाढतो, ज्यामुळे तुमच्या विंडपाइपमध्ये जळजळ होऊ शकते. तेव्हा वातावरणात बदल झाल्यास आरोग्य जपा.

आपल्या आहाराची पूर्ण काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या अन्नातून पूर्ण पोषण मिळत आहे का ते शोधा? कारण जेव्हा शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही, तेव्हा शरीरात अशक्तपणा येतो आणि अनेक आजार होऊ लागतात, ज्यामुळे दम लागणं, थकवा येणे यासारख्या समस्या उद्भवतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI BR Gavai : "मी बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..."; निवृत्तीपूर्वी बीआर गवई काय म्हणाले? बाबासाहेबांचे मानले आभार, सर्वजण स्तब्ध!

जिला कधी अपमानित केलं… तीच ठरली जगाची राणी! मेक्सिकोची फातिमा बॉश मिस यूनिव्हर्स विजेती; भारताची मनिका ‘या’ क्रमांकावर

MP Nilesh Lanke: गड, किल्ल्यांसाठी विशेष निधी द्यावा: खासदार नीलेश लंके; महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे जतन, संवर्धन गरजेचं..

Australian Open Badminton 2025: लक्ष्य, आयुष उपांत्यपूर्व फेरीत; ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन, सात्त्विक-चिराग जोडीचीही वाटचाल

Latest Marathi News Live Update : मालेगावच्या डोंगराळे येथे लहान मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मोर्चा

SCROLL FOR NEXT