smoothies  sakal
लाइफस्टाइल

Health Care News: महिलांनो.. तुम्हालाही PCOS चा त्रास होतोय? मग या हेल्दी स्मूदीजचा आहारात समावेश करा

PCOS कमी करायचाय? 'या' हेल्दी स्मूदीजचा आहारात समावेश करा.

Aishwarya Musale

स्मूदीज खूप रिफ्रेशिंग असतात आणि आपल्याला बर्‍याचदा ब्रेकफास्ट किंवा मिड मील्सदरम्यान स्मूदीज प्यायला आवडते. विविध प्रकारची फळे, भाज्या, दूध किंवा दही यापासून बनवलेल्या स्मूदीज अतिशय आरोग्यदायी मानल्या जातात. विशेषतः, बाजारात उपलब्ध असलेल्या पॅकबंद फळांच्या रसांच्या तुलनेत ते अनेक पटीने अधिक आरोग्यदायी आणि चवदार आहे.

ग्रीन स्मूदी

ग्रीन स्मूदीमध्ये लोह, फोलेट, हेल्दी फॅट्स, ओमेगा-३ फॅटी अॅसिड्स यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात आणि त्यामुळे पीसीओएसची समस्या असल्यास ही स्मूदी खाऊ शकतो.

लागणारे साहित्य

  • 1 कप पालक

  • १/२ कप ब्लूबेरी

  • १/२ एवोकॅडो

  • 1 टेबलस्पून चिया सीड्स

  • 1 टेबलस्पून फ्लेक्स सीड्स

  • 1/2 टीस्पून दालचिनी

  • 1 कप बदामाचे दूध

स्मूदी बनवण्याची पद्धत-

  • ही स्मूदी बनवण्यासाठी सर्व साहित्य ब्लेंडर जारमध्ये ठेवा आणि स्मूथ होईपर्यंत सर्वकाही एकत्र करा.

  • स्मूदीची कंसिस्टेंसी लक्षात घेऊन तुम्ही दुधाचे प्रमाण वाढवू किंवा कमी करू शकता.

बेरी ब्लास्ट स्मूदी

बेरी ब्लास्ट स्मूदी केवळ पिण्यासाठीच चवदार नसतात, तर PCOS नियंत्रित करण्यातही मदत करतात.

लागणारे साहित्य

  • 1 कप मिक्स बेरी (जसे की स्ट्रॉबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरी)

  • १/२ केळी

  • 1 टीस्पून बदाम बटर

  • 1 कप नारळाचे दूध

  • 1 चमचे मध किंवा एग्वेव्ह सिरप

स्मूदी बनवण्याची पद्धत-

  • स्मूदी बनवण्यासाठी प्रथम सर्व साहित्य ब्लेंडर जारमध्ये ठेवा.

  • आता ते चांगले मिसळा.

  • तुमची स्मूदी तयार आहे.

चॉकलेट प्रोटीन स्मूदी

या स्मूदीची चॉकलेट टेस्ट सर्वांनाच आवडते. पीसीओएसची समस्या असल्यास ही स्मूदी प्यायली जाऊ शकते.

लागणारे साहित्य-

  • 1 स्कूप प्लांट बेस्ड प्रोटीन पाउडर

  • 1 टीस्पून कोको पावडर

  • 1 टीस्पून बदाम बटर किंवा पीनट बटर

  • १/२ केळी

  • 1 कप अनस्वीटन ओट मिल्क

  • बर्फाचे तुकडे

स्मूदी बनवण्याची पद्धत-

  • ही स्मूदी बनवण्यासाठी ब्लेंडर जारमध्ये ओटचे मिल्क आणि इतर सर्व घटक मिसळा.

  • आता ते चांगले मिसळा. ते पूर्णपणे स्मूथ झाल्यावर, ते एका ग्लासमध्ये ओतून प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-US War: जगात पुन्हा युद्धाची चाहूल? अमेरिकेवर विश्वास नाही; युद्ध भडकू शकतं, इराणचा कडक इशारा, चिंता वाढली!

Multibagger Stock: लखपतींचे करोडपती बनवणारा स्टॉक! फक्त ₹1 लाखाचे झाले तब्बल ₹1.30 कोटी

अमेरिकेत आणखी एक भारतीय वंशाची महापौर? निवडणूक रिंगणात असलेल्या नित्या रमन कोण?

Ira Jadhavने इतिहास रचला; T20 Mumbai Women’s League मध्ये ठरली सर्वात महागडी खेळाडू; भारताची पहिली त्रिशतकवीर मुलगी...

Junnar 12th Result: जुन्नर तालुक्यात बारावीचा निकाल ९१.४९ टक्क्यांवर; मुलींची बाजी, सात कनिष्ठ महाविद्यालये शंभर टक्के

SCROLL FOR NEXT