लाइफस्टाइल

Health Care News: बायसेप्स वर्कआउट करताना या चार टिप्स फॉलो करा, जाणून घ्या

बायसेप्स वर्कआउट करताना काही छोट्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.

Aishwarya Musale

जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा आपण दररोज शरीराच्या वेगवेगळ्या पार्टला ट्रेन करतो. छाती, पाठ, पाय, खांदे याशिवाय बायसेप्सचा वर्कआउटही केला जातो. बायसेप्स वर्कआउट दरम्यान, आपण बरेच वेगवेगळे व्यायाम करतो. पण या काळात काही छोट्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.

बर्‍याच वेळा असे दिसून येते की लोक बराच वेळ बायसेप्स वर्कआउट करतात, परंतु तरीही आपल्याला त्यांच्या मसल्समध्ये हवा असलेला फरक दिसत नाही. त्यामुळे बायसेप्सचा वर्कआउट योग्य पद्धतीने करणे फार महत्वाचे आहे. तर, आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगत आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही तुमचे बायसेप्स वर्कआउट सेशन आणखी प्रभावी करू शकता-

वार्म अप करा

जेव्हा तुम्ही तुमचा बायसेप्स वर्कआउट करत असाल तेव्हा तुम्ही आधी वॉर्म-अप करणे फार महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा मसल्समध्ये रक्त प्रवाह सुधारतो. ज्यामुळे स्नायूंना दुखापत होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होते.

एवढेच नाही तर वॉर्म अप करून तुम्ही वजन योग्यरित्या उचलू शकता. बायसेप्स वर्कआउट करण्यापूर्वी, तुम्ही वॉर्म-अप म्हणून लाइट कार्डिओ, आर्म सर्कल आणि डायनॅमिक स्ट्रेच करू शकता.

प्रथम आर्मला सेट करा

जर तुम्ही तुमच्या वर्कआउट रूटीनमध्ये फुल बॉडी एक्सरसाइज करत असाल तर आधी तुमचे आर्म ट्रेन करा. विशेषत: जर तुम्हाला मोठे बायसेप्स हवे असतील तर हे आणखी महत्त्वाचे आहे. सामान्यतः असे दिसून येते की लोक प्रथम त्यांच्या बिग मसल्सवर आणि नंतर त्यांच्या लहान मसल्सवर काम करतात.

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की ज्या मसल्सवर आधी काम केले जाते त्यांना जास्त मेहनत करावी लागते. त्यामुळे त्या मसल्सची वाढ चांगली होते. ब्राझीलमध्ये केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की ज्या पुरुषांनी बायसेप्स आणि ट्रायसेप्सचे प्रशिक्षण दिले त्यांची आर्म स्ट्रेन्थ दुप्पट होती.

वेगवेगळे व्यायाम करा

जरी डंबेल कर्ल करणे बायसेप्ससाठी सर्वोत्तम आहे, तरीही तुम्ही तुमच्या वर्कआउटमध्ये आइसोलेशन एक्सरसाइज आणि कंपाऊंड एक्सरसाइज समाविष्ट करणे आवश्यक आहे. बायसेप कर्ल्स आणि हॅमर कर्ल्स सारखे आइसोलेशन व्यायाम थेट बायसेप्सला टारगेट करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PlayOff Scenario: सहा संघांनी खेळले ८ सामने, ४ संघांनी ७! प्ले ऑफच्या जवळ कोण अन् दूर कोण? पाहा Point Table ची स्थिती

IPL 2026 Point Table: सुनील नरीनने ३ चेंडूंत Super Over ची मॅच संपवली; कोलकाता नाइट रायडर्सचा रोमहर्षक विजय, LSG चे पॅकअप?

IPL 2026 News: MS Dhoni च्या चाहत्यांना झटका देणारी बातमी, CSK च्या वाढल्या अडचणी; सराव सत्रात जे घडलं, ते खूपच धक्कादायक...

Shirur Road Delivery Case: शिरूरमध्ये रस्त्यावर प्रसूतीची धक्कादायक घटना; आरोग्य विभागावर नाकर्तेपणाचे आरोप

Gangapur Shadval Baba Urus: अमळनेर वस्तीतील शादवल बाबांचा उरूस उद्या; हिंदू-मुस्लिम एकतेच्या प्रतीक उत्सवात सर्वधर्मीयांचा सहभाग

SCROLL FOR NEXT