Health Care sakal
लाइफस्टाइल

Health Care News: हिवाळ्यात सांधेदुखी, संधिवाताचा त्रास टाळण्यासाठी या गोष्टींकडे वेळीच लक्ष द्या

हिवाळा संधिवात असलेल्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरु शकतो.

Aishwarya Musale

अर्थराइटिस, ज्याला आपण सामान्य भाषेत संधिवात म्हणतो, ही एक अतिशय गंभीर समस्या आहे जी हिवाळ्याच्या काळात लक्षणीय वाढते. हिवाळ्यात सांधेदुखीचे प्रमाण वाढते हे तुम्ही अनेकदा ऐकले असेल. जर तुम्हालाही सांधेदुखीचा त्रास होत असेल आणि थंडीच्या मोसमात तीव्र वेदना सहन करायच्या नसतील, तर या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.

सांधेदुखीच्या रुग्णांनी हिवाळ्यात स्वतःची काळजी घ्यावी

थंडी टाळा

थंडीच्या संपर्कात आल्यावर अनेकदा सांधेदुखीचा त्रास सुरू होतो.आता हिवाळ्यात वातावरण आधीच थंड असते, त्यामुळे स्वतःला उबदार ठेवण्यासाठी लोकरीचे कपडे घालावे लागतात, थंड पाणी प्यावे लागते.

व्हिटॅमिन डीचे प्रमाण कायम ठेवा

हिवाळ्याच्या हंगामात सूर्यप्रकाश क्वचितच असतो, त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता उद्भवते आणि व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे संधिवाताचा त्रास होतो. यामुळे गुडघे आणि पाय दुखणे आणि सूज येण्याची समस्या वाढते.अशा परिस्थितीत जर तुम्हाला सूर्यप्रकाशातून व्हिटॅमिन डी मिळत नसेल तर व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचे सेवन करा. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात अंडी मशरूम, सोया मिल्क, बदाम यासारख्या खाद्यपदार्थांचा समावेश करू शकता.

व्यायाम करा

हिवाळ्याच्या मोसमात आपण अनेकदा अशी कामे करतो, ज्यामुळे आपल्या शरीराची लवचिकता कमी होते, त्यामुळे सांधेदुखीची समस्या वाढते. अशा परिस्थितीत तुम्ही दररोज स्ट्रेचिंग आणि व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही व्यायाम करता तेव्हा रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे तुम्ही सांधेदुखी टाळू शकता.

पुरेसे पाणी प्या

हिवाळ्यात आपण पाणी कमी पितो. त्यामुळे डिहायड्रेशन होते आणि त्यामुळे सांध्यांवर वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत, आपण पुरेसे पाणी पिण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामुळे शरीरातील टॉक्सिन्स निघून जातात आणि वेदना कमी होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"भारताच्या भविष्यासाठी!" टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलची पोस्ट; इरफान पठाणही म्हणतो, कोणत्याही 'पेपर लीक'मुळे...

Paper Leak Fast-Track Courts: पेपरफुटीवर फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी; दोषींना कठोर शिक्षा होणार : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Mumbai News: मोतीलाल नगर पुनर्विकासाची मालकी म्हाडाकडेच; अदाणी फक्त विकासक, म्हाडाचे स्पष्टीकरण

Pune Treefall : स्वारगेट पोलिस लाइनमध्ये वडाचे प्रचंड झाड कोसळून १०-१५ दुचाकींचे नुकसान, २३ दिवसांत शहरात ३७२ झाडपडीच्या घटना

Pune Dry Waste Project: पुण्यात ३०० मेट्रिक टन सुका कचरा प्रकल्पाला स्थायीत बहुमताने मंजुरी; भाजप-काँग्रेस आमनेसामने

SCROLL FOR NEXT