लाइफस्टाइल

Health Care News : मानेवरचा काळपटपणा जातच नाहीये? असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण.. जाणून घ्या

मानेवरचा काळपटपणा जातच नाहीये? मग असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण

Aishwarya Musale

त्वचा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो, पण अनेकदा मानेभोवतीच्या त्वचेचा रंग काळा पडतो. ते दूर करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो पण काळेपणा दूर होताना दिसत नाही. आपण याला त्वचेची किरकोळ समस्या मानतो. खरंतर आपल्या शरीरात काही आजार किंवा काही समस्या असेल तरच मानेचा काळपटपणा कमी होत नाही. चला तर याबद्दल जाणून घेऊया.

मान काळी का पडते?

मधुमेहाची समस्या

मान काळी पडणे हे मधुमेहाचे प्रमुख लक्षण आहे. जेव्हा आपल्या रक्तातील इन्सुलिनचे प्रमाण वाढते, तेव्हा मानेचा रंग काळा होऊ लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही ताबडतोब रक्तातील साखरेची चाचणी करून घ्यावी.

पीसीओडीची समस्या

बहुतेक मुलींना किंवा स्त्रियांना पीसीओडी ची समस्या असते. ज्या महिलांना PCOD आहे त्यांची मानही काळी पडते. पीसीओडीमध्ये इंसुलिन रेझिस्टन्स सिंड्रोम होण्याचा धोका जास्त असतो. याच कारणामुळे मानेजवळ काळे चट्टे दिसतात. तर ज्यांची मान काळी पडली असेल त्यांनी डॉक्टरांकडून योग्य तो सल्ला घेणे गरजेचे आहे.

थायरॉईडची समस्या

थायरॉईडची समस्या असल्यास मानही काळी पडते. थायरॉईड ग्रंथी योग्य प्रकारे हार्मोन्स तयार करू शकत नाही, ज्यामुळे ॲकॅन्थोसिस निग्रिकन्सची स्थिती उद्भवते.

लठ्ठपणाची समस्या

तुमचे वजन जास्त असले तरी मानेभोवती अनेक थर तयार होतात आणि त्यानंतर स्किन पिगमेंटेशन होऊ लागते. त्यामुळे मानेची त्वचा काळी पडू लागते. अशा वेळी त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी वजन कमी करण्यावर भर द्यावा. तर तुमची मान काळी पडली असेल तर डॉक्टरांकडे योग्य तो उपचार घेणे गरजेचे आहे.

हे उपाय करा ट्राय

मसाज करा

मानेचं सौंदर्य वाढविण्यासाठी आणि सुंदर करण्यासाठी खोबऱ्याचं तेल, ऑलिव्ह ऑइल, बदामाचं तेल किंवा रोज ऑइलचा वापर करा. यामुळे मानेच्या त्वचेचं सौंदर्य आणखी खुलवण्यास मदत होते. हातावर तेल घेऊन मानेवर मसाज करा. रात्रभर तसचं ठेवा आणि सकाळी आंघोळ करताना व्यवस्थित स्वच्छ करा.

बेसन

मानेचा काळपटपणा कमी करण्यासाठी दोन मोठे चमचे बेसनमध्ये गुलाब पाणी घालुन पातळ पेस्ट करून घ्यावी. हे मिश्रण मानेवर लावून वीस मिनिटं ठेवावे. या मिश्रणामुळे त्वचेतील पी एच लेव्हल संतुलित राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT